अखेर मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून मा ना एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी घेतली शपथ
अखेर मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून मा ना एकनाथ शिंदे व मा ना अजित दादा पवार यांनी घेतली शपथ

फडणवीस यांनी मी पुन्हा आलोय हे राज्याला दाखवून दिलं
मुंबई:-(प्रतिनिधी)
अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन मी पुन्हा आलोय हे राज्याला दाखवून दिले या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून माँ ना एकनाथ शिंदे व मा ना अजित दादा पवार यांनीही शपथ घेतली या देखण्या सोहळ्यास देशाचे पंतप्रधान मा ना नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा अमित शहा यांच्या सह देश भरातून आलेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्या नंतर मुख्यमंत्री पदावरून तब्बल 12 दिवस चाललेल्या राजकीय नाटया नंतर कालच मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या बैठकीत शिक्का मोर्तब झालं आणि आज मुख्यमंत्री पदाचा पद्ग्रहन सोहळा मान्यवराच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
या वेळी मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मा ना एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनीही शपथ घेतली या देखण्या सोहळ्यास देशाचे पंतप्रधान मा ना नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा अमित शहा यांच्या सह भाजप नेते योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, नितीनजी गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे,
प्रसिद्ध उद्योजक अंबानी परिवार
देश भरातून आलेले विविध राज्याचे मुख्यमंत्री, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यास खा शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
या वेळी 2019 साली मी पुन्हा येनार– मी पुन्हा येणार– मी पुन्हा येणार– म्हणून गर्जना केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलोय हे राज्याला दाखवून दिले.
एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर तेज नाही
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार संभाळलेले मा ना एकनाथ शिंदे यांनी या वेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी मात्र व्यासपीठावर आल्या पासून ते एका बाजूला बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी नाराजीचा सूर सर्वाना दिसत होता.
