लोकसभेला पोस्टल मतमोजणी व ईव्हीएम मतमोजणीचा ट्रेंड शेवट पर्यंत कायम राहिला विधानसभेला मात्र पोस्टल मतमोजणीचा ट्रेंड ईव्हीएम मतमोजणी मध्ये अचानक बदलला कसा?
शंकेचे निरसन करण्या साठी व्हीव्हीपॅट ची मतमोजणी करण्यासाठी निवडणूक आयोग का तयार होत नाही?

मुंबई :- (प्रतिनिधी)
राज्यात लोकसभा निवडणुकीत पोस्टल मतमोजणी व त्या नंतरची ईव्हीएमची मतमोजणीचा ट्रेंड शेवट पर्यंत कायम राहिला व पुढे तसेच निकाल लागले विधानसभा निवडणुकीत मात्र पोस्टल मतमोजणी मधील ट्रेंड पुढे ईव्हीएम मतमोजणी मध्ये अचानक बदलला व महायुतीला घवघवीत यश मिळाले या मुळे ईव्हीएम मशीन संशयाच्या भवऱ्यात सापडली असून विरोधकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी व निकालात पारदर्शकता येण्यासाठी व्हीव्हीपॅट ची मतमोजणी करण्यासाठी निवडणूक आयोग का तयार होत नाही हा खरा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आसून यात कितपत तथ्य आहे हे स्पष्ट करणे आज तरी कठीण असले तरी एकूण निकाल पाहता शंकेला कुठे तरी वाव आहे हेही नाकारून चालणार नाही.
राज्यात असे अनेक मतदार संघ असे आहेत की काही मतदार संघात विजयी उमेदवारांना काही मतदार संघात पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतांची सम-समान आकडेवारी कशी असू शकते.
पोस्टल व ईव्हीएम मशीनच्या मतांचा अभ्यास करता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पोस्टल मतदानात मविआचा 31 जागांवर आघाडीवर होती तर 16 जागांवर महायुतीला आघाडी होती आणि तोच ट्रेड शेवट पर्यंत कायम राहून राज्यात लोकसभेचे निकाल लागलेले महाराष्ट्राने पाहिले आहेत मात्र नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर होती तर महायुती 140 जागांवर आघाडीवर होती. मात्र ईव्हीएमच्या मतमोजणी मध्ये पोस्टल मतदानात 143 जागेवर पुढे असलेली महाविकास आघाडी ईव्हीएम मतमोजणी मध्ये थेट 46 जागा पर्यंत खाली आली आणि पोस्टल मतदानात 140 जागावर पुढे असलेल्या महायुतीने ईव्हीएम मतमोजणी मध्ये थेट 230 पर्यंत गरुड झेप घेतली. 12 जगावर अपक्ष व अन्य छोट्या पक्षाने विजय मिळवला पोस्टल व ईव्हीएम मतमोजणीचा एवढा ट्रेंड बदललाच कसा हा खरा प्रश्न आहे. राज्यात
आदित्य ठाकरे यांच उदाहरण घ्यायचं ठरलं तर त्यांना 51 टक्के मतं पोस्टलमध्ये मिळाली. 30 टक्के मतं मिलिंद देवरा यांना मिळाली. आदित्य ठाकरे 21 टक्क्यांनी पुढे होते. Evm मध्ये बघितलं तर 44 टक्के आदित्य ठाकरे यांना तर 38 टक्के देवरा यांना मते मिळाली. महाविकास आघाडीच्या जवळपास अनेक उमेदवार हे पोस्टलमध्ये महायुतीच्या उमेदवारापेक्षा मोठ्या फरकाने पुढे आहेत. तर ईव्हीएम मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महायुती उमेदवाराच्या एकदम मागे गेले हे कसे घडले.
हीव्हीपॅटची मतमोजणी झाली पाहिजे
विधानसभा निवडणुकीत पोस्टल व ईव्हीएम मतमोजणी मध्ये एवंढी मोठी तफावत कशी आली? हा खरा प्रश्न असून मतमोजणी मध्ये लोकसभेचा ट्रेंड तोतो ट्रेंड शेवट पर्यंत राहिला मात्र विधानसभा मध्ये तो ट्रेंड कसा बदलला? याआकडेवारीचा अभ्यास केला तर एकच दिसत आहे की, पोस्टलमध्ये महाविकास आघाडी पुढे असताना ईव्हीएम मध्ये 5 ते 15 टक्के कमी मिळाल्याने ती मागे गेली आणि यातच गोंधळ झाल्याचे दिसत आहे. हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले असताना अनेक ठिकाणी असा सांगितलं जातंय की आम्ही मॉक पोल करून दाखवणार आहोत. मात्र हीव्हीपॅटची मतमोजणी झाली तरच ईव्हीएम वरील शंकेचे काही अंशी निरसन होणार आहे.
Post Views: 174