*रा काँ शरदचंद्र पवार गटाच्या संभाव्य यादीत संदीप क्षीरसागर, पृथ्वीराज साठे, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, राजाभाऊ फड यांच्या नावाचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त*
मुबंई (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बीड जिल्ह्यातील सर्वच मतदार संघाच्या संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली असून या मध्ये संदीप क्षीरसागर, पृथ्वीराज साठे, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, राजाभाऊ फड यांच्या नावाचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेणाऱ्यांची संख्या राज्यभरासह बीड जिल्ह्यात ही वाढली असून सर्वच मतदार संघातून उमेदवारी मागणारांची संख्या ही मोठ्या प्रमानात आहे.
येत्या 2 दिवसात विधानसभा निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने व बीड जिल्हा हा शरदचंद्र पवार यांना माननारा जिल्हा असल्याने महाविकास आघाडीच्या तडजोडी मध्ये शरद चंद्र पवार गटाने बीड जिल्ह्यातील सहाही मतदार संघावर या पूर्वीच आपला दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून राज्यातील संभाव्य उमेदवारांची जी यादी बाहेर आली आहे या मध्ये बीड विधानसभा मतदार संघासाठी पक्षाचे एकनिष्ठ आमदार संदीप क्षीरसागर, केज मतदार संघातून पक्षाचे एकनिष्ठ माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजलगाव मतदार संघातुन रमेश आडसकर, आष्टी मतदार संघातुन भीमराव धोंडे, गेवराई मतदार संघातुन लक्ष्मण पवार तर परळी मतदार संघातून राजाभाऊ फड यांच्या नावाचा समावेश असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी
सांगितले
