मुंबई

बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या की एनकाउंटर*

मुबंई (प्रतिनिधी)

   बदलापूर येथील त्या शाळेतील 2 चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या की एनकाउंटर झाला या विषयी अनेक तर्क वितर्क करण्यात येत आहेत.

     मागील महिन्यात बदलापूर येथील एका शाळेत सफाई काम करणाऱ्या अक्षय शिंदे या युवकाने शाळेत शिकणाऱ्या अंदाचे चार वर्षीय 2 चिमुकलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्या नंतर संपूर्ण राज्य भरात खळबळ उडाली, या घटनेचा सर्व स्तरा मधून निषेध व्यक्त होत होता. प्ररकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बदलापूर पोलिसांनी त्याच वेळी अक्षय शिंदे यास अटक केली होती व त्यावेळेस पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.
     त्याला चौकशी साठी घेऊन जात  असताना अक्षयने पोलिसा कडील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार करत असताना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार करून त्याचा एन्काऊंटर केल्याचे वृत्त असून काहींच्या मते त्याने आत्महत्या केल्याचेही बोलल्या जात असून अक्षय शिंदे चा मृत्यू नेमका कोणत्या प्रकारातून झाला या विषयी तर्क वितर्क करण्यात येत असून लवकरच सत्य समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!