माजलगाव

स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला आ प्रकाश दादा सोळंके धावले, एक तासात 13 लाख 67 हजार रुपये जमा 13 डिसेंम्बर रोजी माजलगाव शहरात मदतफेरीचे आयोजन

स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला आ प्रकाश दादा सोळंके धावले, एक तासात 13 लाख 67 हजार रुपये जमा 13 डिसेंम्बर रोजी माजलगाव शहरात मदतफेरीचे आयोजन

माजलगाव(प्रतिनिधी)
   माजलगाव येथील आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी मस्साजोग येथे जाऊन स्व संतोष देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या पुढाकारातून एक तासात 13 लाख 67 हजार रुपये जमा करण्यात आले असून 13 डिसेंम्बर रोजी माजलगाव शहरात मदतफेरी काढून आणखी निधी जमा करून माणुसकीचे दर्शन घडवणार आहेत.
   या वेळी प्रतिक्रिया देताना आ प्रकाश सोळंके यांनी म्हंटले आहे की, स्व.संतोष देशमुख घरातील कर्ता पुरुष लोकांसाठी वाहून घेणारा उमदा तरुण आज आपल्यामध्ये नाही.गेलेला माणूस परत येणार नाही परंतु कुटुंबांचे छत्र हरवल्या नंतर आज या कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीचा हात म्हणून मदतनिधी जमा करण्याची संकल्पना डोक्यात आल्या मुळे आ प्रकाश दादा सोळंके यांच्या वतीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबास १० लक्ष रुपये निधी देऊन सामाजिक दायित्व जपण्याचा  प्रयत्न त्यांनी केला आहे. माजलगाव सह बीड जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे येऊन देशमुख कुटुंबासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही या वेळी आ सोळंके यांनी केले आहे.
   सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे आ सोळंके यांनी मदतीचे आवाहन केल्या नंतर तासाभरातच १३ लक्ष ६७ हजार रुपये मदतनिधी जमा झाला असून पत्रकार संघ, वकील संघ, व्यापारी महासंघ, पतसंस्था, रोटरी क्लब अशा विविध संघटना मदत निधी जमा करण्या साठी पुढाकार घेत आहेत.
    दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता माजलगाव शहरात मदतफेरीचे आयोजन केले असून यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ही आ सोळंके यांनी माजलगाव वासीयांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!