माजलगाव

महाराष्ट्रात खाते वाटपा वरून आढलेले मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे पुढे काही सरकायला तयार नाही

महाराष्ट्रात खाते वाटपा वरून आढलेले मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे पुढे काही सरकायला तयार नाही

मुंबई(प्रतिनिधी)
    नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास अवघे 5 दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात खाते वाटपा वरून आढलेले मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे पुढे सरकण्यास काही तयार होत नसून राज्यातील सर्व नागरिकांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागून राहिलेल्या आहेत.
    राज्यात विधानसभा निवडणुकीत  महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं आणि सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी मा ना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, मा ना  एकनाथ शिंदे व मा ना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन देखील पार पडलं. या विशेष अधिवेशनात सर्व आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रमही पार पडला. मात्र, आता सरकार स्थापन होऊन सहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत
   एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही आहेत पण गृहखात शिवसेनेला देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे, गृह खात्या सह अर्थ, नागरी विकास, जल संधारण आदी खाते वाटपा वरून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास वेळ का लागत आहे? या मागची कारणं काय आहेत हे संजय शिरसाट यांनी सांगितली आहेत.
  मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर यादी दिल्लीत फायनल होणार असल्याची चर्चा आहे. मग नेमकं मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होईल? आणि आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? हा चर्चेचा विषय झाला आहे.
   “राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष. मग या तीनही पक्षांमध्ये खाते वाटप कसे असेल किंवा कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं? हे ठरवण्याचा प्रश्न महायुतीमधील तिन्ही नेत्यांचा आहे.
   एखाद्याला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही. निवडून आलेल्या आमदारा पैकी कोणत्या नविन चेहऱ्याला संधी दयायची? जातीय समीकरणे कशी जुळवायची हे धर्मसंकट नेत्या समोर आहे,
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?
   मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत गेली आहे की नाही? याची माहिती मला नाही. मात्र, पुढील तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं की, हिवाळी अधिवेशनाच्या आधी म्हणजे १३ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागेल. कारण १५ डिसेंबरला नागपूरला सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना जावं लागनार आहे कारण १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरु होईल. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार १३ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!