*अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाची माजलगाव शहरात गुटख्यावर धाड एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
माजलगाव (प्रतिनिधी)
अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाने माजलगाव शहरात साठा करून ठेवलेल्या गुटख्यावर धाड टाकून एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल आज जप्त केला.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, आज दिनांक 15.10.2024 रोजी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक तिडके मॅडम यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की माजलगाव ग्रामीण हद्दीमध्ये मौजे सादोळा या ठिकाणी एक इसम गुटख्याचा साठा करून विक्री करत आहे. सदरच्या माहितीच्या आधारे कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांना सदर बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन अधिकारी व आमदार यांनी सादोळा येथे राजू गोपाळराव साखरे यांच्या कन्फेशनरी दुकानात छापा टाकून खात्री केली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या किमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू त्याच्या ताब्यात मिळून आली.
त्यानुसार दोन पंचा समक्ष पंचनामा करून व सदरचा 1,20000-/ रुपये किमतीचा गुटख्याचा माल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर, संजय राठोड, सचिन सिद्धेश्वर, तानाजी तागड राऊत, बाबरे यांनी केली
