नौकरी करून चाकर होण्या पेक्षा व्यवसाय उभा करून मालक बना- प्रा सोमनाथ बडे
वडवणी, दि. २३ (प्रतिनिधी):
नौकरी करून चाकर होण्या पेक्षा व्यवसाय उभा करून मालक बना असे मत प्रा सोमनाथ बडे यांनी व्यक्त केले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या संकल्पनेतून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र शासन अंतर्गत गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढेकणमोहा येथे नुकताच कार्यक्रम घेण्यात आला. या केंद्राकरिता गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने वर्धा या ठिकाणी करण्यात आले. हा कार्यक्रम लाईव्ह पध्दतीने गोरक्षनाथ कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन भाषणानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संस्थेचे सचिव प्रा. सोमनाथराव बडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नौकरीमध्ये लागलेल्या भयान स्पर्धेच्या मागे न लागता, एखादा छोटा मोठा उद्योग, व्यवसायात आपले नावलौकिक मिळवावे. दुसऱ्याकडे नौकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय उभारुन स्वतः मालक बना असे म्हणत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित भिसे सर, मयूर बडे, डी.एस. मुंडे सर, संजय बड़े सर, पर्यवेक्षक एस.डी. घोळवे सर, मकरध्वज शिक्षक पतसंस्थेचे सचिव सतिश सांगळे, मनोज बडे सर, नागेश शिंदे, थापडे पाटील, गोवर्धन दराडे, रामभाऊ भोगे सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
