लातूर येथील नामांकित आयकॉन हॉस्पिटलचे मालक डॉ प्रमोद घुगे व डॉ अनिकेत मुंडे यांच्या मारहाणीत बाळू डोंगरे नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आईचा आरोप
लातूर येथील नामांकित आयकॉन हॉस्पिटलचे मालक डॉ प्रमोद घुगे व डॉ अनिकेत मुंडे यांच्या मारहाणीत बाळू डोंगरे नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आईचा आरोप
लातूर (प्रतिनिधी)
लातूर येथील नामांकित आयकॉन हॉस्पिटलचे मालक डॉ प्रमोद घुगे व डॉ अनिकेत मुंडे यांनी याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या बाळू डोंगरे नामक कर्मचाऱ्यास मारहाण करून खून केल्याचा आरोप बाळू डोंगरे यांच्या आईने केला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की डॉ प्रमोद घुगे यांच्या मालकीचे लातूर येथील रेणापूर नाका परिसरात आयकॉन हॉस्पिटल नावाचे रुग्णालय असून याच रुग्णालयात बाळू भारत डोंगरे नामक कर्मचारी सूपरवायझर म्हणून काम करत होता. 6 महिन्या पूर्वी डॉ घुगे आणि बाळू डोंगरे या दोघांवर पोतंगे प्रकरणी खंडणी, अपहरण व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आलेला असून दोन दिवसा पूर्वी डॉ अनिकेत मुंडे व डॉ प्रमोद घुगे यांनी बाळू डोंगरे यास बेदम मारहाण केली व यातच त्याचा मृत्यू झाला असा आरोप मयत बाळू डोंगरे यांच्या आई प्रमिला डोंगरे यांनी केला असून त्यांच्या फिर्यादी वरून लातूर येथील शिवाजी नगर पोलिसात दोन्ही डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान 4 दिवसा पूर्वी बीड जिल्ह्यात झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा आणि संविधान मोडतोड केल्या परभणी जिल्हा पेटलेला असताना आता लातूर जिल्ह्यातही ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे
