लातूर

लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटीस- नळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी चिंतेत

 

लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटीस- तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी चिंतेत

लातूर,(प्रतिनिधी)

लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवल्या मुळे लातूर जिल्ह्यातील- तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत मोठे भाष्य केले आहे.  विधानसभेच्या विशेष अधिवशेनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना लातूरमधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत विचरण्यात आले. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सामान्य लोकांचे सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.”

            नेमके प्रकरण काय?

लातूर जिल्ह्यातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. या जमिनीच्या वादात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेले आहे. या प्रकरणामुळे तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!