*शिवसेना नेते मा उद्धवजी ठाकरे यांची बॅग तपासण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आणि निवडणूक आयोगाला सुचत असलेली विनाशकाली विपरीत बुद्धी*
लातूर (प्रतिनिधी)
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पाठोपाठ लातूर जिल्ह्यातील औसा हॅलीपॅड वरती निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्या कडुन शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांची बॅग तपासण्याचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आणि विनाशकाली विपरीत बुद्धी असा असून निवडणूक आयोगाने आता पर्यंत किती सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या हे ही स्पस्ट व्हायला हवे.
आज महाराष्ट्रात विधान सभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच पक्षांचे प्रमुख नेते आपआपल्या पक्षा सह घटक पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यभर दौरे करत असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्या नंतर निवडणूक आयोगा कडुन पक्ष चिन्हा बाबत घेतलेल्या निर्णया मुळे आणि उच्च न्यायालया कडुन होत असलेल्या तारीख पे तारीख मुळे शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी राज्यभर सहानभूतीची लाट निर्माण झाल्याने सत्ताधारी मंडळी कडुन त्यांना बदनाम कसे करता येईल याचे प्रयत्न करताना दिसत असून निवडणुकीच्या या रणधुमाळी मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ काल यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे मा उद्धवजी ठाकरे हॅलिकॅप्टर ने आले असता निवडणूक अयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली. या बॅग मध्ये काहीही निघालेले नसताना आज परत उद्धव ठाकरे हे लातूर जिल्ह्यातील औसा येथे शिवसेना उमेदवार माजी आमदार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ हॅलिकॅप्टर ने आले असता ते हॅलिकॅप्टर मधून उतरताच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी बॅग तपासण्या बाबत उद्धव ठाकरे यांना विनंती केली. उद्धव ठाकरे यानीही त्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्या सोबत अतिशय संयमाने केलेला संवाद हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून समोरचे कर्मचारी ही अत्यंत केविलवाणी पणे मजबुरीने आपण बॅग तपासत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहेत.
दरम्यान या दोन्ही ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांची बॅग तपासण्याचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आणि निवडणूक आयोगासाठी विनाशकाली विपरीत बुद्धी असा असून यातून ठाकरे यांच्या विषयी आणखी सहानभूती वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्या मुळे आता पर्यंत किती सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या हे ही स्पस्ट व्हायला हवे अशी मतदारातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
