लातूर

*मांजरा धरण 96 टक्के भरल्याने आज 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा*

लातूर (प्रतिनिधी)
   लातूर-बीड-धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण 96 टक्के भरल्या मुळे आज दुपारी 12.30 वाजता मांजराचे दोन दरवाजे उघडण्यात येणार असून मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पुरनियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    आज दि. 25-09-2024 रोजी सकाळी ठीक 10.00 वा. मांजरा प्रकल्प  *96.05%* क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 25/09/2024 रोजी ठीक 12:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक्स  (49.00 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे
   तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येनार असून मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन
पुरनियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!