Thursday, April 2, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*अंबाजोगाई शहरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या टवाळखोर मुलांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस एक्शन मोडवर, 3 दिवसात 2 कार्यवाह्या*

*अंबाजोगाई शहरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या टवाळखोर मुलांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस एक्शन मोडवर, 3 दिवसात 2 कार्यवाह्या*

*पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचा अशा टवालखोर मुलावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा, वाढदिवस साजरा करणारांचे फोटो पाठवण्याचे आवाहन*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     अंबाजोगाई शहरातील काही टवाळखोर मुलांचे टोळके पोलीस यंत्रनेने वारंवार आवाहन करून ही रस्त्यावर फटाके, तोफा वाजवून वाढदिवस साजरा करत असल्याच्या तक्रारी पोलिसात प्राप्त झाल्या असून मागील 3 दिवसात दोन ठिकाणी साजरा केलेल्या वाढदिवसानंतर संबंधित मुलावर रीतसर कार्यवाही करण्यात आल्या नंतर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अशा टवालखोर मुलावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊन असे वाढदिवस साजरा करणारांचे फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

    या पूर्वी अंबाजोगाई पोलिसांच्या आवाहना नंतर शहरामध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण कमी झाले होते मात्र मागील काही दिवसा पासून ते पुंन्हा वाढले आसुन वाढदिवस साजरा करताना मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो. वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा आपसात भांडणे होतात व यापूर्वी बीड येथे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. मागील तीन दिवसांत वाढदिवस साजरा केलेल्या दोन प्रकरणांमध्ये संबंधित मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणून कारवाई करण्यात आलेली आसुन यापुढेही अशी कारवाई सतत सुरू राहणार आहे.

   रस्त्यावर साजरे होतं असलेले वाढते वाढदिवस पाहता अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अशा टवाळखोर मुलांना आवाहनाच्या माध्यमातून एक प्रकारे तंबी दिली आहे. यापुढे जर कोणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना व फटाके वाजवताना आढळून आले, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

    ज्या ठिकाणी असे वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार आढळून येतील, त्या भागातील नागरिकांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तींचे फोटो

मोटारसायकल / चारचाकी वाहनांचे नंबर प्लेटचे फोटो आदी माहिती 9225092823 या संपर्क क्रमांका वर कळवून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी नागरीकांना  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!