Skip to content
अंबाजोगाई शहरात वैशाली चिकटकर या विवाहितेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन यात्रा संपवली

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेल्या वैशाली चिकटकर या विवाहित महिलेने ती राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील मांडवा रोडवर घडली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील रहिवाशी असलेले सुनील चिकटकर हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरातील मांडवा रोडवर असलेल्या शितोळे यांच्या तीन मजली इमारतीमध्ये किरायाने राहत होते.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमरास सुनील चिकटकर यांची पत्नी सौ. वैशाली सुनील चिकटकर हिने घरात कोणीही नाही हे पाहून मी राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खाली उडी घेतली. यावेळी ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि जागेवरच गतप्राण झाली.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला ही मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे व तिच्यावर उपचार सुरू होते असे सांगण्यात येत आहे.
शव विच्छेदना साठी वैशाली चिकटकर यांचे प्रेत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हालवले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
Post Views: 991
error: Content is protected !!