Skip to content
अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील अडीच वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी मुलीच्या आत्याच्या 15 वर्षीय मुलानेच लैंगिक आत्याचार केल्याचे उघड, पोलिसांनी आरोपी विरुद्ध केला सुमू टू गुन्हा दाखल

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे 17 मार्च रोजी अडीच वर्षीय चुकलीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून मयत मुलीच्या आत्याच्या 15 वर्षीय मुलानेच आपल्या मामाच्या चिमुकलीस चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून लैंगिक आत्याचार केल्याचे उघड झाल्या नंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध सुमू टू गुन्हा दाखल केला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की,
पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत मौजे डोंगर पिंपळा येथील 02 वर्ष,05 महिने वयाची मुलगी खेळत असताना दिनांक 17. 3. 2026 रोजी घरासमोर पाण्याचे हौदामध्ये पडून बुडून मयत झाली होती. या बाबत पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रा.14/2026 u/S 194 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक मुरलीधर रा.खोकले यांनी केलेल्या तपासात सदर अकस्मात मयत मधील मुलगी वय दोन वर्ष पाच महिने ही पाण्यात पडून मयत झाल्यानंतर पोस्टमार्टम साठी एस आर टी आर हॉस्पिटलमध्ये अंबाजोगाई येथे दाखल झाल्या नंतर डॉक्टरांनी सदर मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने मुरलीधर खोकले यांनी हॉस्पिटल येथे भेट देऊन तिच्या नातेवाईकांना डॉक्टरांचे म्हणणे प्रमाणे माहिती नातेवाईक यांना देण्यात आले तसेच नातेवाईक व स्त्री पंच यांना मयत मुलीचे शारीरिक परिस्थिती पोलिसा समोर डॉक्टरांनी नातेवाईकांना दाखवून सांगितले.
तरी सुद्धा नातेवाईक यांनी मुलीवर अत्याचार 100% झाले नसावेत व त्यांचा कोणावर संशय नाही अशी माहिती दिली.
नातेवाईकाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे म्हणणे ऐकून सदर मुलीचा मृत्यू व अत्याचार संबंधी क्युरी रिपोर्ट करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी यांनी अल्पवयीन मयत मुलीवर कमी वयाचे मुलाकडून लैंगिक अत्याचार झालेला असावा, तसेच मयताचे मरणापूर्वी एक दोन आठवड्यात कालावधीत झालेला असावा असे माहिती दिली व कॉज ऑफ डेथचे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देण्यात आले.
चौकशीमध्ये व लैंगिक अत्याचार संबंधाने पोलिसांनी मयत मुलीचे नातेवाईक व घटनास्थळाचे आजूबाजूचे साक्षीदार तपासले. तसेच गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते. मिळालेल्या साक्षीदाराकडील व गुप्त बातमीदारा कडील माहितीवरून 26/3/26 रोजी मौ.डोंगर पिंपळा येथे घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली, प्राप्त गोपनीय व साक्षीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून संशय आल्याने विधी संघर्षग्रस्त बालक वय पंधरा वर्षे पाच महिने हा मयत मुलीचे अत्याचा मुलगा व मयत पीडित ही मामाची मुलगी वय दोन वर्ष पाच महिने असे असताना पोलिसांनी विधी संघर्ष ग्रस्त बालक यास सदर मुलीचे मृत्यूनंतर तीन दिवस जेवला नाही रडत होता अशी माहिती मिळाल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता
पीडित मुलीस तिच्या आई जवळून चॉकलेट घेऊन देतो असे म्हणून आला होता व त्याने मयत मुलीस मोटरसायकल वर बसून किराणा दुकानावर जाऊन चॉकलेट घेऊन आपले राहते घरी कोणी नसताना रूम बंद करून घेऊन पीडितेचा मृत्यू होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर व त्यापूर्वी एक वेळा असे दोन वेळा जबरी संभोग गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्या नंतर निदर्शनास आलेली परिस्थिती व वैद्यकीय अधिकारी यांचे अभिप्राय माहितीवरून पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन यातील विधी संघर्षग्रस्त बालक याचे विरुद्ध कलम 64 (1), लहान मुलांचे लैंगिक संरक्षण अधिनियम कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा नोंद केला आसुन पुढील तपास कामे पिंक पथक सपोनी संतोष जाधवर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Post Views: 659
error: Content is protected !!