*बामुक्टाची बीड जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्ष पदी डॉ अर्जुन मोरे तर सचिव पदी डॉ शंकर वाघमारे यांची बिनविरोध निवड*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर असोसिएशन संघटनेच्या (बामुक्टा)जिल्हाध्यक्षपदी वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुरचे प्रभारी प्राचार्य डॉ.अर्जुन मोरे यांची तर सचिवपदी प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर चे डॉ. शंकर वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ.राजेश करपे यांनी दिली आहे.
माजी व्यवस्थापन सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बलभीम महाविद्यालय बीड येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. या मध्ये संघटनेच्या (बामुक्टा)जिल्हाध्यक्षपदी वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुरचे प्रभारी प्राचार्य डॉ.अर्जुन मोरे यांची तर सचिवपदी प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर चे डॉ. शंकर वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदी डॉ.संजय सुरवशे, उपाध्यक्ष पदी डॉ. विलास भिलारे, डॉ. राजकुमार थोरवे, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे सहसचिव पदी डॉ.सुनील जाधव डॉ. हरिभाऊ कदम यांची निवड करण्यात आली.
केंद्रीय कार्यकारणी मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून डॉ. सतीश कदम डॉ. खामकर सुचिता डॉ.रफिक शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्याशिवाय तालुका प्रतिनिधी म्हणून डॉ. राजकुमार चाटे ,डॉ. सखाराम पांढरे ,डॉ. रमेश माने डॉ. पठाण डॉ. गजानन दराडे डॉ. ज्ञानेश्वर येवले डॉ.सिताराम इंगोले डॉ. सचिन खिस्ते डॉ. अशोक होके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस डॉ. अंकुश कदम डॉ. विलास खंदारे डॉ. अप्पा हुंबे प्राचार्य डॉ.संतोष उंदरे डॉ.प्रशांत कुमार वंनजे सिनेट सदस्य डॉ. मुंजा धोंडगे डॉ. बाबासाहेब कोकाटे डॉ. रमेश वारे उपस्थित होते या सर्वांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले.
Post Views: 158