ताज्या घडामोडी

*प्रवाशांच्या सेवेसाठी राबले योगेश्वरी तंत्रनिकेतनच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हात*…

*प्रवाशांच्या सेवेसाठी राबले योगेश्वरी तंत्रनिकेतनच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हात*…

अंबाजोगाई :- (प्रतिनिधी)

    योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक हे केवळ तंत्रशिक्षणातच नव्हे तर सामाजिक उपक्रमात देखील अग्रेसर असते. प्रवाशांच्या सेवेसाठी… असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटीच्या अंबाजोगाई बसस्थानकाच्या स्वच्छतेचा उपक्रम योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी हाती घेतला. या उपक्रमामध्ये 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरातील झुडपे, गवत काढले. बस स्थानकाचा संपूर्ण परिसर या मुलांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छ केला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मुलांना पाहून बसस्थानक कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत त्यांना मदत केली.त्याचा परिणाम म्हणजे अवघ्या दोन तासात बस स्थानक स्वच्छ झाले. या उपक्रमाकरिता प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा.नारायण सिरसाट, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.शाम गडदे, प्रा. प्रियंका गंभीरे, प्रा.निशांत मस्के, डॉ. संकेत तोरंबेकर, श्री. ज्ञानेश्वर धुमाळ, श्री विश्वजीत इंगळे व श्री.योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अंबाजोगाई आगार प्रमुख श्री.अमर राऊत व स्थानक प्रमुख श्री.हरिदास गिरी,योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!