Skip to content
यशवंतराव चव्हाण जयंती, गझल सम्राट सुरेश भट पुण्यतिथी व जागतिक महिला दिना निमित्त गझलरंग– महिला गझल मुशायराचे अंबाजोगाईत आयोजन*

अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिन, यशवंतराव चव्हाण यांची जयंती व सुरेश भट पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर– जिल्हा केंद्र बीड, यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने व सुरेश भट गझल मंच पुणे आयोजित महिलांचा विशेष गझल मुशायरा गझलरंग अंबाजोगाई येथे आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील महिला गझलकार यात सहभागी होणार आहेत अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई – जिल्हा केंद्र बीडचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे दिली आहे.
८ मार्च जागतिक महिला दिन, १२ मार्च यशवंतराव चव्हाण यांची जयंती व १४ मार्च गझलसम्राट सुरेश भट यांच्या पुण्यतिथी निमित हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सुरेश भट गझलमंच, पुणे येथील मुख्य शाहिर सुरेशकुमार वैराळकर हे या मुशायऱ्याचे सूत्र संचालन करणार आहेत. या मुशाऱ्यात ज्योत्स्ना राजपूत– पनवेल, अश्विनी विटेकर– सेलू, अल्पना नायक– पुसद, विजयालक्ष्मी वानखेडे–बुलढाणा, सुहासिनी देशमुख– नांदेड, किर्ती वैराळकर– पुणे, सांची कांबळे– बारामती व श्वेता बरकडे– सातारा यांचा समभाग असणार आहे. या कार्यक्रमास दत्ता बाळसराफ कार्यक्रम समन्वयक, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, अतिरिक्त जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे–जिरांगे, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, ज्येष्ठ मुक्त पत्रकार अमर हबीब, निलेश राऊत, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई – सचिव जिल्हा केंद्र संभाजीनगर, दत्तात्रय पाटील, केंद्रीय सदस्य, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व राजपाल लोमटे, सचिव वेणूताई चव्हाण.प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथे हा मुशायरा संपन्न होईल. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अनिकेत लोहिया अध्यक्ष, डॉ. नरेंद्र काळे, सचिव यशवंतराव चव्हाण सेंटर–मुंबई जिल्हा केंद्र बीड, दगडू लोमटे, सचिव यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई व डॉ. शिवदास शिरसाठ, प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांनी केले आहे.
Post Views: 31
error: Content is protected !!