Skip to content
एम.आय.टी पुणे संचलित श्री सरस्वती पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय गुणवत्ता SQAAF मूल्यांकनात ‘अ+’ मानांकन प्राप्त.
अंबाजोगाई तालुक्यातील एकमेव शाळा

अंबाजोगाई :
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) अंतर्गत सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकनामध्ये एम.आय.टी पुणे संचलित श्री सरस्वती पब्लिक स्कूलला नागझरी अंबाजोगाई या शाळेला ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातून ही एकमेव शाळा असून या यशामुळे परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शाळांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन व सातत्यपूर्ण सुधारणा करण्याच्या उद्देशाने SQAAF ही मूल्यांकन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या अंतर्गत शाळेच्या शैक्षणिक कार्यपद्धती, व्यवस्थापन, अध्यापन-अभ्यास प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध घटकांचे सखोल मूल्यमापन करण्यात येते.
या प्रक्रियेमध्ये शाळेचे स्वयं-मूल्यमापन (Self Evaluation) तसेच त्यानंतर बाह्य तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी (External Evaluation) करण्यात आली. शाळेचे मूल्यांकन करताना पुढील महत्त्वाच्या घटकांवर विशेष लक्ष देण्यात आले जसे कि, शाळेचे नेतृत्व व व्यवस्थापन व्यवस्था,अध्यापन-अभ्यासाची गुणवत्ता आणि अध्यापन पद्धती,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक प्रगती,शाळेतील भौतिक सुविधा, प्रयोगशाळा व ग्रंथालय,शिक्षकांचे व्यावसायिक विकास व प्रशिक्षण,शाळा-पालक-समाज यांच्यातील समन्वय व सहभाग,शाळेतील पारदर्शकता, शैक्षणिक नियोजन व गुणवत्तावाढ उपक्रम इ.
या सर्व घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे श्री सरस्वती पब्लिक स्कूल, अंबाजोगाई या शाळेला राज्यस्तरावर अ+ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामध्ये शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल एम.आय.टी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. वि. दा. कराड,कार्यकारी संचालक श्री.राजेश कराड, सौ.शुभांगीताई कराड, संचालक श्री.संगप्पा तलेवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 81
error: Content is protected !!