Thursday, February 26, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा यांची 150 वी जयंती अंबाजोगाई येथे उत्साहात साजरी* 

*राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा यांच्या 150 वी जयंती अंबाजोगाई येथे उत्साहात साजरी* 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :–

    “श्री संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. श्री संत गाडगेबाबा आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवत, अंबाजोगाई शहरात स्वच्छ अंबाजोगाई , सुंदर अंबाजोगाई ‘ हे संदेश नेण्याचा आपला निर्धार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेमध्ये सहभागी होऊन तो लोकसहभागातून एक यशस्वी निर्धार करावा, असे प्रतिपादन अंबाजोगाई नगरींचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री नंदकिशोर मुंदडा यांनी केले

    श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगेबाबा परिट समाजमंदिर गणेश नगर बलुतेचा मळा अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगर पालिकेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेविका रेखा विलास जाधव, सोनल धायगुडे नगरसेवक ,गणेश देशमुख नगरसेवक , संजय गंभीरे नगरसेवक , महेश कदम नगरसेवक , महेश अंबाड नगरसेवक ,गोविंद तांदळे.( केज विधानसभा अनुलोम मुख्यमंत्री सहाय्यक प्रमुख ), संकेत मोदी, श्रीकांत धायगुडे, व्यंकटेश जोशी पत्रकार बालाजी शेरेकर, आत्माराम कदम हे मान्यवर उपस्थित होते.

    अध्यक्षस्थानावरून यावेळी बोलताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, समाजप्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचा अखंड ध्यास घेतलेले संत गाडगेबाबा हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील तेजस्वी दीपस्तंभ होते. साधी वेशभूषा, हातात झाडू आणि ओठांवर कीर्तनातून समाजजागृती—या माध्यमातून त्यांनी लोकांच्या  मनात परिवर्तनाची ज्योत पेटवली.

    “स्वच्छता हीच सेवा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी गावोगावी फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आणि शिक्षण, दया, करुणा व मानवतेचे संस्कार रुजवले. समाजातील गरिब, पीडित आणि वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्य वेचले.

आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करून स्वच्छ, सुसंस्कृत आणि समतामूलक समाज घडवण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

गाडगेबाबांच्या नावाने या भागात उभ्या राहणाऱ्या सभागृहासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या कार्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला साथ देऊन आपले परिसर स्वच्छ ठेवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब जाधव, अशोक जाधव, विलास जाधव, संजय जाधव, अजय जाधव, गुलाबराव जाधव, महादेव जाधव, धनंजय जाधव, बालाजी लोखंडे, गणेश लोखंडे, योगेश राऊत,रमेश जाधव, कैलास सवणे, डिगंबर जाधव, मदन जाधव, हनुमंत सरपाळे, शरद सौदागर (ग्रामसेवक), सोपान शिंदे, अर्जुन जाधव,  अशोक दळवे, सचिन जाधव, वैजनाथ जाधव, अविनाश शिंदे ,अमोल शिंदे, श्रीकांत काळे, अनिकेत पवार,राहुल भोसले, सुशील भोसले, लक्ष्मण भोसले, सुग्रीव जाधव, अंगद जाधव, मनोज सौदागर, रवींद्र रोकडे, पांडुरंग पवार, सुशील जाधव गोविंद जाधव, तानाजी राऊत, वैभव सरपाळे, बालाजी राऊत, शशिकांत दळवे, पांडुरंग दळवे, सुरेश पवार,किशोर दळवे,विकास राऊत,पंकज शिंदे, रविकिरण जाधव, योगेश राऊत, अनिल जाधव, विठ्ठल जाधव, या आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संतोष भालेकर यांनी मानले. या सोहळ्याला परिसरातील महिला, पुरुष व बालकांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!