Skip to content
22 फेब्रुवारी 2026 रोजी कर्जत येथे होणाऱ्या आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – डॉ इंगोले, आंबेकर व घरत यांचे आवाहन

अंबाजोगाई(प्रतिनिधी)
22 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कर्जत येथे होणाऱ्या आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले यांच्यासह बीड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय आंबेकर व समन्वयक अभिमन्यू घरत यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना दरवर्षी पुरस्कारांनी गौरविले जाते. आठ महसूल विभागातून प्रत्येकी एका तालुका संघाची निवड केली जाते.. यावेळी विशेष बाब म्हणून विदर्भातून दोन तालुका संघांना तसेच मुंबई उपनगरांतून एका पत्रकार संघाला सन्मानित केले जाणार आहे.. राज्यातील 36 जिल्ह्यातून एका आदर्श जिल्हा संघाची निवड केली जाते..
2025 मधील आदर्श जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार *परभणी जिल्हा पत्रकार संघाला* देण्यात येत आहे.
पुढील तालुका संघांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत..
*नागपूर विभाग* : बेला तालुका पत्रकार संघ जिल्हा नागपूर
*नागपूर विभाग* : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि. गडचिरोली
*नाशिक विभाग* : नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ जिल्हा नाशिक
*कोंकण विभाग* : पनवेल महानगर प्रेस क्लब जि. रायगड
*पुणे विभाग* : आंबेगाव तालुका पत्रकार संघ जि. पुणे
*लातूर विभाग* : किनवट तालुका पत्रकार संघ जि. नांदेड
*संभाजीनगर विभाग* : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ जि. बीड
*अमरावती विभाग* : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ जि. बुलढाणा
*कोल्हापूर विभाग* : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ जि. सांगली.
*मुंबई विभाग* :उपनगर पत्रकार असोशिएशन,
22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप राहणार असून मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
मागील 5 वर्षात केलेल्या कार्याची परिषदेने दखल घेत अंबाजोगाई शाखेला केला आहे पुरस्कार जाहीर
मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेने मागील 5 वर्षाच्या कारकिर्दी मध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमा बद्दल छत्रपती संभाजी नगर विभागाचा तालुका पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेने अंबाजोगाई तालुक्याला जाहीर केल्या मुळे मराठी पत्रकार परिषदे च्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी, विभागीय सदस्य सुभाषजी चौरे, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळंके, विलासजी डोळसे, रवी उबाळे
यांचे विशेष आभार व्यक्त केले असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले यांच्यासह बीड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय आंबेकर व समन्वयक अभिमन्यू घरत यांनी केले आहे.
Post Views: 287
error: Content is protected !!