Monday, February 16, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणी पुरवठा नियमित करून वीज पुरवठा अखंडीत ठेवा* *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांचे निवेदन*

*पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणी पुरवठा नियमित करून वीज पुरवठा अखंडीत ठेवा*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांचे निवेदन*


======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दिनांक १८ किंवा गुरूवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे‌ (जो चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असेल) या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणी पुरवठा नियमित करून वीज पुरवठा अखंडीत ठेवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर दगडुसाहेब देशमुख यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबाजोगाई व उपअभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर दगडुसाहेब देशमुख यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दिनांक १८ किंवा गुरूवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे‌ (जो चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असेल). या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. तरी किमान मुस्लिम बहुल भागात नियमित उच्च दाबाने सकाळच्या वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच या महिन्यात नमाज पठण करण्यासाठी प्रार्थना स्थळे (मस्जिद) जाण्या-येण्याच्या मार्गावर स्वच्छता ठेवण्यात यावी. या रस्त्यावरील नाल्या नियमित स्वच्छ करण्यात याव्यात.तरी मे.साहेबांनी संबंधित विभागाला वरील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सूचना देवून अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच उपअभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम भगिनींना पहाटे सहरी करण्यासाठी लवकर उठून स्वयंपाक करावा लागतो. तसेच येणारा महिना हा उन्हाळ्याचा असल्याने व मुस्लिम बांधवांना उपवास असल्याने दिवसभरात पंखा, कुलरची आवश्यकता असते. त्यामुळे किमान मुस्लिम बहुल भागात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यात यावा. सदरील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना सूचना देवून अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर दगडुसाहेब देशमुख यांनी केली आहे. निवेदन देताना नगरसेवक राजपाल जावळे व नगरसेवक नजीर मुन्ना पठाण यांची उपस्थिती होती. तर सदरील निवेदनावर ऍड.इस्माईल गवळी, राहुल सिरसट, हमीद चौधरी, आमेर चौधरी, सलिम गवळी, जावेद पप्पुवाले, सिद्धू लोमटे, आसेफ प्यारेवाले, अरशद खॉंन पठाण, जुबेर पठाण, इरफान खॉंन पठाण, सलिम पिंजारी आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

======================

======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!