Skip to content
*चनई ग्रामपंचायतीत बीड हायवेवर राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याचे अनावरण*

अंबाजोगाई प्रतिनिधी :
चनई ग्रामपंचायतीच्या वतीने बीड हायवेवर राजमाता जिजाऊ यांच्या भव्य पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात देशभक्ती आणि प्रेरणेची भावना दाटून आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवमती राधाताई रामदास सपकाळ जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बीड उपस्थित होत्या तसेच अनिल शिंदे चनई उपसरपंच ,प्रभाकर सावरे, सरपंच पती प्रवीण कदम, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दत्ता भाऊ सावरे, गायकवाड मामा, विलास सावरे, विजय सावरे, निखिल कदम, बिरुदेव गोचडे तसेच इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्वांच्या उपस्थितीत पुतळ्याचे पूजन व अभिवादन करण्यात आले.
राजमाता जिजाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात आदर्श घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत चनई व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले.
Post Views: 193
error: Content is protected !!