Sunday, February 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई शहरातील तथागत चौक ते यशवंतराव चव्हाण चौक येथील स्ट्रीट लाईट असून अडचण आणि नसून खोळंबा

अंबाजोगाई शहरातील तथागत चौक ते यशवंतराव चव्हाण चौक येथील स्ट्रीट लाईट असून अडचण आणि नसून खोळंबा

 

 अंबाजोगाई प्रतिनिधी 
     अंबाजोगाई शहरातील अत्यंत मोठ्या प्रमाणावर रहदारी असलेल्या तथागत चौक ते यशवंतराव चव्हाण चौक येथील स्ट्रीट लाईट म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशाच म्हणण्याची वेळ आता नागरिकावर येऊन ठेपली आहे.
     अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौक या ठिकाणाहून रिंग रोड मार्गे यशवंतराव चव्हाण चौका कडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट या गेली अनेक दिवसापासून बंद असून तथागत चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट या तर पूर्णपणे बंद असल्याने
आणि पुणे मुंबई छत्रपती संभाजी नगर या शहराकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स याच रस्त्यावरून मार्गस्थ होत असल्याने व तथागत चौक या ठिकाणी सर्व ट्रॅव्हल्सचे थांबे असल्याने या परिसरात ट्रॅव्हल्सची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याशिवाय तथागत चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व दुचाकी स्वार यांना स्ट्रीट लाईट बंद असल्याकारणाने अंधाराचा सामना करण्याची वेळ आली असून यातून काही लुटारु महिला भगिनी व दुचाकीस्वाराची लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय वयोवृद्ध नागरिक व महिला भगिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न यातून निर्माण झाला आहे याला जबाबदार कोण आहे? हा सवाल प्रवासी व नागरिक करू लागले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होताना दिसते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!