ई-शिवाई बसमध्ये सर्वसामान्यांना सवलत, मात्र अधिस्वीकृत पत्रकार वंचित; पत्रकारांसाठी सवलत लागू करण्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे मागणी
ई-शिवाई बसमध्ये सर्वसामान्यांना सवलत, मात्र अधिस्वीकृत पत्रकार वंचित; पत्रकारांसाठी सवलत लागू करण्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्य परिवहन महामंडळाच्या ई-शिवाई बससेवेत सर्वसामान्य प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असताना लोकशाहीचा चौथा खांब मानल्या जाणाऱ्या अधिस्वीकृत पत्रकारांना मात्र या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असून पत्रकारांवर अन्याय करणारी असल्याचे मत मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक व ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आंबेकर यांनी व्यक्त करत पत्रकारा साठी ही सवलत तात्काळ लागू करावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे केली आहे.
पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. ग्रामीण व दुर्गम भागात बातमी संकलनासाठी प्रवास करणे पत्रकारांना अपरिहार्य असते. अशा परिस्थितीत ई-शिवाई बससेवेत अधिस्वीकृत पत्रकारांना सवलत देणे अत्यंत आवश्यक आहे. ई शिवाई बसेस मध्ये महामंडळाने दिलेल्या सवलती नुसार महिला, वयोवृद्ध या सह अन्य नागरिकांना सवलत देण्यात येते मात्र जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना या बसेस मध्ये सवलत दिल्या जात नाही.
नेट वर सर्च केले तर मोफत सवलती मध्ये अधिस्वीकृती पत्रकारांना मोफत सवलत दाखवल्या जाते मात्र प्रत्यक्षात ही सवलत दिल्या जात नाही.
याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ लक्ष घालून अधिस्वीकृत पत्रकारांना ई-शिवाई बससेवेत सवलत लागू करण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे केली आहे.
पत्रकारांवरील हा अन्याय दूर न झाल्यास पत्रकार संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी देण्यात आल आहे.
Post Views: 148


