जयप्रकाश ज्वेलर्सच्या वतीने 23 जानेवारी 2026 रोजी ग्राहकांच्या सन्मान सोहळ्या निमित्य मान्यवरांच्या उपस्थितीत “अबकी बारी हेलिकॅप्टर की सवारी” या योजनेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा
जयप्रकाश ज्वेलर्सच्या वतीने 23 जानेवारी 2026 रोजी ग्राहकांच्या सन्मान सोहळ्या निमित्य मान्यवरांच्या उपस्थितीत “अबकी बारी हेलिकॅप्टर की सवारी” या योजनेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात अल्पावधीमध्ये नावारूपाला आलेल्या जयप्रकाश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दालनाच्या वतीने 23 जानेवारी 2026 रोजी ग्राहकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्त “अबकी बारी हेलिकॅप्टर की सवारी” या योजनेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा खा. बजरंग सोनवणे, आ नमिता ताई मुंदडा यांच्या सह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
२३ जानेवारी २०२६ वार शुक्रवार रोजी सायं. ०४ : ३० वाजता अंबाजोगाई शहरातील साखर कारखाना रोडवरील साधना मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटक बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ नमिता ताई मुंदडा या उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी मा.श्री. डॉ. दादा लाड (भारतीय किसान संघ, क्षेत्रीय संघटन मंत्री महाराष्ट्र, गोवा, राज्यस्थान, गुजरात प्रांत) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून याप्रसंगी मा.श्री. पृथ्वीराज साठे (माजी आमदार केज विधानसभा)
मा. सौ. संगिताताई ठोंबरे (माजी आमदार केज विधानसभा) मा.श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा (नगराध्यक्ष, न.प. अंबाजोगाई), मा.श्री. राजकिशोर (पापा) मोदी (माजी नगराध्यक्ष, न.प. अंबाजोगाई, चेअरमन अंबाजोगाई पिपल्स बैंक), मा. श्री. बालासाहेब दोडतले (माजी राज्यमंत्री, यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष), मा. श्री. दत्ता (आबा) पाटील (व्हा. चेअरमन, अंबाजोगाई शहकारी साखर कारखाना ), मा.श्री. राम कुलकर्णी (पत्रकार तथा भाजपा प्रवक्ता महाराष्ट्र)मा.श्री. बळीरामजी सोळंके (भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष) मा.श्री. बबन (भैय्या) लोमटे ( माजी उपनगराध्यक्ष) मा.श्री. मनोज लखेरा माजी उपनगराध्यक्ष), श्री. बिपीन क्षिरसागर (राष्ट्रीय स्वयम सेवक जिल्हा कार्यवाह बीड),मा.श्री. अमर देशमुख (माजी सभापती बा.स. अंबाजोगाई) मा.श्री. अरूण (आबा) काळे मेडिकल असोसियशन, उपाध्यक्ष जिल्हा बीड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरवासींयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयप्रकाश ज्वेलर्सचे मालक भीमराव शिंदे व जयप्रकाश शिंदे
यांनी केले आहे.
Post Views: 13


