Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*स्वारातीच्या स्त्रीरोग विभागाने रचला इतिहास* *वर्षभरात एकूण 16,640 शस्त्रक्रिया*

*स्वारातीच्या स्त्रीरोग विभागाने रचला इतिहास*
*वर्षभरात एकूण 16,640 शस्त्रक्रिया*

 

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाईच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात लहान व मोठ्या अशा एकूण 16,640 शस्तक्रिया पार पाडून नवा उच्चांक गाठला आहे व रुग्णसंखेत एक नवीन इतिहास रचला आहे.

सन 2025 मध्ये विभागाने नॉर्मल प्रसूती 6287 ,तसेच सिझेरियन प्रसूती 6758
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 1654 ,गर्भपात शस्त्रक्रिया 1035 ,गर्भपिशवी काढणे शस्त्रक्रिया 276 व इतर काही शस्त्रक्रिया 630 अशा एकूण 16,640 शस्त्रक्रिया सुरळीत पार पडले आहेत.
तसेच विभागाने अत्यंत अवघड व अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या आहेत.
स्त्री रोगप्रसूतीशास्त्र विभागात आजूबाजूच्या सहा जिल्ह्यातून रुग्ण मोठ्या संख्येने येतात विभागात मातांची व बाळांची चांगली काळजी घेतल्या जाते ,तसेच वार्डातील स्वच्छता, स्वच्छ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कमी मनुष्यबळात तज्ञ व अनुभव डॉक्टर्स स्टाफ कर्मचारी यांनी हे दिव्य काम पार पाडले आहे.

सन 2021 च्या एम टी पी ऍक्ट च्या बदलानुसार यापुढे 24 आठवड्यानंतर सुद्धा बाळाच्या व्यंगासाठी व आईच्या जीवाला धोका असेल तर माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नाही कारण कायद्यानुसार स्वा राती मध्येच वैद्यकीय मंडळ स्थापन असून कायद्याने या मंडळालाच योग्य निर्णय घेऊन 24 आठवड्यानंतरचे गर्भपात करण्याची परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत त्यामुळे जनतेने या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉक्टर गणेश तोडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

कमी मनुष्यबळात तज्ञ अनुभव डॉक्टर्स, स्टाफ, कर्मचारी ,माननीय अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे सर डॉक्टर राकेश जाधव सर यांच्या मदतीने हे शक्य झाले आहे व त्यामुळेच सन 2025 मधील या अतिउच्च कामगिरीमुळे स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाचे सर्व डॉक्टर्स, स्टाफ नर्स, कर्मचारी, निवासी डॉक्टर्स यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे असे मत विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोडगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!