Skip to content
योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेमध्ये घवघवीत यश:

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा – 2025 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या चि. प्रबल तिवारी (95.88%) , कु. विशाखा तिडके (95.53%) व श्रुतिका सूर्यवंशी (95.41%) टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्याचबरोबर प्रथम वर्षात शिकणाऱ्या कल्याणी बोळके, पूनम मुंडे, लक्ष्मी मुंडे, पंकजा फड, समृद्धी यादव, सायली मोरे, अभय सावंत, प्राची भोसले, समीर शेख, अखिल चौधरी या विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण संपादित करून, राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी प्रा.नारायण सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर Strength of materials या विषयात चि. वेदांत जोशी याने 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांला प्रा. काझी झेड. पी. यांचे मार्गदर्शन लाभले या उत्तुंग यशामुळे योगेश्वरी पॉलिटेक्निक तंत्रशिक्षणामध्ये राज्यात अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले आहे. मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने योगेश्वरी शिक्षण संस्थेद्वारे जून 2011 मध्ये योगेश्वरी पॉलिटेक्निक या विभागाची सुरुवात करण्यात आली. गेल्या 14 वर्षाच्या कार्यकाळात योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी सातत्याने गुणवत्ता सिद्ध करत महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान कायम ठेवला आहे.
या निकालामध्ये प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून कु. दांड अस्मिता, (91.06%) कु. शिंदे साक्षी, (91.06%) कु. यादव समृद्धी (91.06%) प्रथम, बोळके कल्याणी (91.29%) द्वितीय., मुंडे पूनम (90.12 %) तृतीय, द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून स्वामी सिवंजली (85.41 %) प्रथम, देशमुख सायली (83.88%) द्वितीय, देशमुख धनश्री (83.29 %) तृतीय. तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विभागातून प्रबल तिवारी (95.88%) प्रथम, विशाखा तिडके (95.53%) द्वितीय, श्रुतिका सूर्यवंशी (95.41%) तृतीय.प्रथम वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून मोरे सायली (91.71%) प्रथम, कांबळे संचिता (91.29 %) द्वितीय, वायसे ओम (89.06 %), तृतीय, द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका वर्गातून, शेख मुस्कान (86.00%) प्रथम, अकुस्कर पायल (85.44%) द्वितीय, होळकर स्वाती (84.00%) तृतीय, तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून हारे अश्विनी (94.12%) प्रथम, राऊत रोहिणी (93.06%) द्वितीय, चौघुले निलेश (88.59%) तृतीय.प्रथम वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून फड पंकजा (89.65%) प्रथम, यादव साक्षी (89.53%)द्वितीय, लोमटे समर्थ (89.29%), तृतीय, द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून बडे सौदागर (94.94%) प्रथम, जोशी वेदांत (94.35%) द्वितीय, पांचाळ ऋतुजा (91.88%) तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून मुळे हर्ष (94.11%). प्रथम, सस्ते तेजस्विनी (93.56%) द्वितीय, पवार सुश्मिता (90.78%) तृतीय. प्रथम वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून शेख समीर (92.71%) प्रथम, चव्हाण श्रद्धा (88.35%) द्वितीय, चौधरी आखिल तृतीय, द्वितीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून समीना शेख (86.00%) प्रथम, सानिका कुलकर्णी (79.50 %) द्वितीय, कुलकर्णी मधुसुधन (77.25%) तृतीय, तृतीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून पार्थ वेदपाठक (90.82%) व रोहन जाधव (90.82%) प्रथम, साक्षी सरवदे (88.35%) द्वितीय, नीरज जोगदंड (87.77%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशामागे विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे व सर्व शिक्षकीय कर्मचा-यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री .गणपत व्यास, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, संचालक श्री.प्रताप पवार व योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
इन्सेट मध्ये
योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात सर्वप्रथम येऊन, तंत्रशिक्षणात संस्थेचे नाव उज्वल केले आहे. या यशाबद्दल सर्व गुणवंत शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करतो.
श्री.चंद्रशेखर बर्दापूरकर अध्यक्ष,यो. शि. संस्था अंबाजोगाई.
इन्सेट मध्ये
90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी
कु. दांड अस्मिता, कु. शिंदे साक्षी, कु. यादव समृद्धी, कु. बोळके कल्याणी, कु. मुंडे पूनम, कु. मोरे सायली, कु. कांबळे संचिता, चि.शेख समीर, चि.निरंजन मोरे, कु. दिव्या हरंगुळे, कु. प्रतीक्षा गुट्टे.
Post Views: 417
error: Content is protected !!