Skip to content
माईर एम.आय.टी. पुणे संचलित कै.दादाराव कराड विद्यालयात
वार्षिक क्रीडा महोत्सव 2025–26 चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
माईर एम.आय.टी. पुणे संचलित कै.दादाराव कराड विद्यालय, नागझरी (अंबाजोगाई) येथे दिनांक 29 डिसेंबर 2025, वार सोमवार रोजी शैक्षणिक वर्ष 2025–26 च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* झाला.
शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक क्रीडा महोत्सवाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य रामराजे कराड यांनी भूषविले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी तालुका क्रीडा संयोजक मा.श्री. देवकते साहेब उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला मा. संचालक संगप्पा तलेवाड, श्री सरस्वती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर राऊत, उपप्राचार्य शरद बोंदर, श्री मोतीपवळे, श्री जयभाये, श्री शंकर मुंडे व सौ. संध्या केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. पाहुण्यांच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मार्चपास, लेझीम व तायकांदो प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, संघभावना, सहकार्य, ध्येयाधिष्ठता व जिद्द निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी शपथविधी पार पडला.
यां वेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. देवकते साहेब यांनी शालेय जीवनात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. “क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व मानसिक विकास साधता येतो, जो शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत पोषक ठरतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य रामराजे कराड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले.
या वेळी क्रीडा विभाग प्रमुख श्री प्रभाकर घुले, श्री परमेश्वर मुसळे,श्री हनुमंत साने व श्री बालाजी कराड यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कोकाटे व वैष्णवी फड यांनी प्रभावीपणे केले, तर स्कूल कॅप्टन विजय मुंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या व्हॉलिबॉल सर्व्हिसने क्रीडा महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Views: 383
error: Content is protected !!