Skip to content
अलखैर पतसंस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचा विश्वास संपादन केलेल्या अलखैर नागरी पतसंस्थेच्या कार्यामध्ये आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून हा एक मानाचा तुरा पतसंस्थेच्या यशस्वीतेमध्ये रोखला गेला आहे. आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने त्यांची व संचालक मंडळाचे सर्वस्तरांतुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

अंबाजोगाई तालुक्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून गोरगरीब व सर्वसामान्य माणसाचा विश्वास बनलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने सातत्याने समाजहित पाहिलेले आहे. छोठ्या छोटया माणसाला आर्थिक बळ देवून मोठे करणारी ही पतसंस्था राज्यामध्ये एकमेक असल्याचे सांगितले जाते. कारण या पतसंस्थेचे धोरण आणि इतर पतसंस्था व बँकांचे धोरण नक्कीच निराळे आहे. कारण या ठिकाणी माणूसकी व मानवहित जपले आणि जोपासले जाते. इतर ठिकाणी व्यवसाय आणि ग्राहक या दोन अर्थानेच पाहिले जाते. अलखैरमध्ये छुपे कर किंवा अतिरिक्त शुल्क वसुल केले जात नाहीत. केवळ नाममात्र सेवा शुल्क आकारुन सेवा देण्याचा प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून सातत्याने सुरु आहे. या पतसंस्थेने अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त केलेले आहेत. राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करुन नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील डिजिटलायजेशन आत्मसात करुन त्याचा उपयोग ग्राहकांना योग्य वेळी झाला पाहिजे याची खबरदारी घेतलेली आहे. पतसंस्थेच्या कार्यात आता मानाचा तुरा खोवला आहे. अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन प्राप्त करण्यासाठी जे काही निकष आहेत त्या निकषाला खरी उतरण्याचे काम पतसंस्थेने केले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील आयएसओ मानांकन प्राप्त करणारी बहुधा अलखैर नागरी सहकारी पतसंस्था एकमेव असावी. पतसंस्थेला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल चेअरमन शेख उमर फारुक सर, उपाध्यक्ष मुजम्मील खतीब, सचिव शेख रिजवान, संचालक शेख मुजाहेद, बदर अली उस्मानी, सिद्दीकी मोहम्मद रईस, शेख अब्दुला साजेद जिलानी, शेख शकीला बेगम तालेब, खान परवीन सुलताना सत्तार व व्यवस्थापक सय्यद रौफ यांचे अभिनंदन केले आहे. कारण या संस्थेला आकार देण्यामध्ये संस्थेचे सर्व संचालक, व पदाधिकारी यांचे मोठे योगदान असल्याने हे मानांकन त्यांना प्राप्त झाले आहे.
Post Views: 129
error: Content is protected !!