Sunday, October 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

चनई येथील महिला बचत गटातील ७०० महिलांना ग्रामनिधीतून १४०० वृक्ष वाटप. गावातील स्मशानभूमीत १०० वृक्षांची लागवड.

चनई येथील महिला बचत गटातील ७०० महिलांना ग्रामनिधीतून १४०० वृक्ष वाटप. गावातील स्मशानभूमीत १०० वृक्षांची लागवड.

 

अंबाजोगाई प्रतिनिधी :-
दि. १८ ऑक्टोबर: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अंबाजोगाई तालुक्यातील चनई गावात ग्रामनिधीतून महिला बचत गटातील ७०० महिलांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ‘एक महिला – २ वृक्ष’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. या मधे ८०० केशरआंबा ची व ६०० चिक्कू ची कलम केलेली झाडे महिलाना वाटप करण्यात आली. तसेच गावातील स्मशानभूमध्ये 50 पिंपळाची व 50 वडाची झाडे लागवड केली आहे.

चनई ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात फळझाडे, औषधी वनस्पती आणि छायादायक झाडांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक महिलेला तिच्या आवडीनुसार झाडे निवडण्याची संधी देण्यात आली.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ. रोहिणी प्रभाकर सावरे, उपसरपंच श्री. अनिल शिंदे ग्रामसेवक श्री. लक्ष्मण देशमाने तसेच बचत गटांच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या. सरपंचांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांचा सहभाग हा पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ही झाडे फक्त लावायची नाहीत, तर त्यांचे संगोपन करून ते विकसित करणे, ही जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे.”

महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी वृक्षारोपणाबाबत आपल्या जबाबदाऱ्या स्विकारत, झाडांचे पालनपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ग्राम निधीचा उपयोग करून समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचे चनई ग्रामपंचायतीचे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!