Skip to content
आत्महत्याग्रस्त ६०० शेतकरी कुटुंबांना उद्या दिवाळी फराळ वाटप आधार माणुसकीचा उपक्रम

अंबाजोगाई : आधार माणुसकीचा उपक्रमांतर्गत सोमवारी (दि.२०) ६०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना लोकसहभागातून दिवाळी फराळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी दिली.
येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत मागील ७ वर्षांपासून ६०० कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी फराळ वाटप केला जातो. यंदा हे आठवे वर्ष आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या कुटूंबातील मुलांना वर्षभर पुरेल एवढे स्कूल बॅगसह शालेय साहित्य दिले जाते.
सोमवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते येथील सायली मंगल कार्यालयात हा दिवाळी फराळ वाटप केला जाणार आहे. यात मोतीचूर लाडू, चिवडा, शेव, शंकरपाळे असा प्रत्येकी २ ते अडीचकिलो फराळ या कुटुंबांना दिला जातो. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, कॅन्सरग्रस्त, एचआयव्ही बाधित व कोरोनाग्रस्त कुटुंबांचा यात समावेश आहे.
या फराळाची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी मुकुंद राजपंखे हे राहाणार आहेत. अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, दीनदयाल बँकेच्या माजी अध्यक्षा शरयु हेबाळकर, प्रा. डाॅ. भागीरथी गिरी, प्रा. संध्या ठाकरे, डाॅ. जिगीशा मुळे, ॲड. पद्मजा कल्याण लोमटे, पार्वती थोरात, संगीता नावंदर, कल्पना देशपांडे (महाजन), दिपाली धनराज काळे, रागिनी आंबाड यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
Post Views: 135
error: Content is protected !!