Sunday, October 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

*निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना नौकरी* *योगेश्वरी पॉलिटेक्निकचा अभिनव उपक्रम*

*निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना नौकरी*
*योगेश्वरी पॉलिटेक्निकचा अभिनव उपक्रम*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाच्या पहिल्या सत्रातच नोकरी मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

      पॉलिटेक्निक मधील 13 विद्यार्थी तृतीय वर्षात असतानाच Powercon Ventures india ltd. या नामांकित कंपनीत निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अश्विनी हारे,निकिता चव्हाण ,कोमल माळी,भूमिका परदेसी ,श्वेता ढवारे,निलेश चौगुले ,माऊली दौंड,निखिल वचकरण,ओम लाखे ,अभय राऊत,कृष्णाचोंदे,संदीप माने आणि गणेश थोरबोले यांचा समावेश आहे.
निवड झालेले विद्यार्थी हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील गरीब,होतकरू व मजुरी व्यवसाय करणाऱ्या पालकांचे विद्यार्थी असून, त्यांना महाविद्यालयातूनच कॅम्पस मुलाखतीतून नोकरी लागल्यामुळे अल्पावधीतच विद्यार्थी कुटुंबाचा आधार बनले आहेत. ही संस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आहे.
कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री .चंद्रशेखर बर्दापूरकर, संस्थेचे सहसचिव श्री.भीमाशंकर शेटे, योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे व कंपनीचे प्रतिनिधी श्री.रामनिवास मावळ,श्री दैवेश वैद्य यांची उपस्थिती होती.या कॅम्पस मुलाखतीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. शाम गडदे, प्रा. बप्पासाहेब सोनवणे व प्रा. सचिन हारे यांनी मेहनत घेतली.
या उपक्रमाबाबत संस्थेचे उपाध्यक्ष श्री गणपत व्यास, का. उपाध्यक्ष ॲड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री. कमलाकरराव चौसाळकर यांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!