Sunday, October 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

*भाजपाकडून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी मागणी अर्ज दाखल करावेत आवाहन* *भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार ; अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प राबविणार : भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे*

*भाजपाकडून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी मागणी अर्ज दाखल करावेत आवाहन*

*भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार ; अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प राबविणार : भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे*


———————————————————
अंबाजोगाई / प्रतिनिधी
अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणुक भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढवणार आहे. आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प राबविणार आहोत. त्यामुळे भाजपाकडून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी मागणी अर्ज दाखल करावेत असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले आहे.

आमच्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या दूरदृष्टीतून‌ अंबाजोगाईकरांच्या विकासाचा संकल्प राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहरच्या प्रमुख पदाधिकारी आणि नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी मागणी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर आणि बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या संपर्क कार्यालयात दाखल करावेत. या ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के आणि नाना गायकवाड हे उपस्थित राहून सदरचे अर्ज स्विकारतील. यावेळी आवाहन करताना शहराध्यक्ष गंभीरे यांनी अंबाजोगाई शहरातील संघटनात्मक आढावा सांगितला तसेच सर्वच प्रभागात ताकदीचे उमेदवार उपलब्ध असल्याचे ही सांगितले, आमच्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून आणलेला भरीव विकास निधी, ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा काकाजी आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या दूरदृष्टीतून‌ झालेली असंख्य विकास कामे, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम आणि राबविलेले उपक्रम यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळेल, अशी खात्री शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी व्यक्त केली.

——————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!