*मायक्रो ओबीसी वर अन्याय झाला तर 24 तास आपल्या साठी ए टी एम मशीन बनायला तयार आहे* *येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात रोहिणी आयोग लागू करावा मागणी साठी आवाज उठवणार* *आमदार संजय केनेकर यांचे उदगार*
*मायक्रो ओबीसी वर अन्याय झाला तर 24 तास आपल्या साठी ए टी एम मशीन बनायला तयार आहे*
*येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात रोहिणी आयोग लागू करावा मागणी साठी आवाज उठवणार*
*आमदार संजय केनेकर यांचे उदगार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मायक्रो ओबीसी वर अन्याय झाला तर 24 तास हा संजय केनेकर आपल्या साठी ए टी एम मशीन बनायला तयार आसुन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात रोहिणी आयोग लागू करावा या प्रमुख मागणी सह आपल्या समाजाच्या समस्ये वर आवाज उठवणार आहे असे अभिवचन विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांनी काढले.
भीमराव जगन्नाथ दळे (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय बलुतेदार-अलुतेदार विकास परिषद यांच्या पुढाकाराने आंबेजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या मायक्रो ओबीसी चिंतन शिबिरा मध्ये आ. केनेकर हे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा महाराज यांचे वंशज प्रवीण जी जानोरकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे, शशिकांत आमणे (संस्थापक अध्यक्ष, बलुतेदार-अलुतेदार संघ.), जानकीराम पांडे (प्रदेशाध्यक्ष, बेलदार समाज संघटना.) यांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे, बालाजी सिंगे, प्रशांत डोरले, दिलीप सोनवणे, विलास जावळे, रामेश्वर शिंदे, विजय पोहनेरकर, शुभम डहाके, अनंत उमाटे, विजय देवडे, भुमन्ना अक्केमवाड, मुकेश शिवगण, सुरेश धोत्रे, कैलास गोसावी, अतुल लोहार, सुदर्शन बोराडे, संध्या राजपूत, संजय जोरले कलीम जहांगीर, लक्ष्मण पाटोळे, राजेश पंडित, अक्षय शिंदे यांची प्रमुख उवस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. संजय केणेकर म्हणाले की, फुले शाहू आंबेडकर हे महामानव आमचे दैवत आहे त्यामुळे यांच्या मागे जाणारा समाज हा मायक्रो ओबीसी समाज आहे. तरीही मायक्रो ओबीसी समाजाची किती तरी दिवसा पासून फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने आमची बोळवन सुरु आहे. एकाही गोष्टीची मालकी नसलेला, स्वतःच्या संस्था नसलेला समाज म्हणजे मायक्रो ओबीसी समाज. खऱ्या अर्थाने दिन दलित उपेक्षित मायक्रो ओबीसी मधेच सापडतो.
मी माझी जात कधी लपवली नाही. माझ्या व्यथा याच माझ्या समाजाच्या आहेत, बारा बलुतेदारांच्या आहेत. मी मायक्रो ओबीसी समाजाचा असताना मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांनी मला ताकत दिली.
धर्म संस्कृतीचा राष्ट्राचा कणा आहे. मायक्रो ओबीसी समाजातील लोकांवर पावलो पावली अन्याय अत्याचार होतो आहे. गोवंश साठी लढणारा न्हावी समाचा पोरगा आज जेल मध्ये आहे. गुरव समाजाच पोरग मारलं गेलं. आज राज्यकर्त्याला डोके जास्त असणारा समाज चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळी संभाजी नगर मध्ये आले त्यावेळी मी आपले दुखणे त्यांच्या कानावर घातल्या मुळे त्यांनी आपल्या भाषणात छोटे छोटे पिछडे जातीयों को ताकत देना है असे जाहीर वक्तव्य केले.
आपल्या लढ्यातून रोहिणी आयोग तर करुचं करू मात्र ज्या काही शासनाच्या कमीट्या आहेत यात आज पर्यंत मायक्रो ओबीसीच्या व्यक्तींना संधी मिळत नव्हती. मात्र या पुढे आशा कमीट्या मध्ये मायक्रो ओबीसीला चेअरमन, सदस्य या पदाचा वाटा दयावाच लागेल.
आपण जागो जागी चार पाच असलो तरी महाराष्ट्रात भरपूर आहोत. येणाऱ्या काळात सत्तेत वाटा देण्याचे काम मी निश्चित करेल. मी मायक्रो ओबीसीचे काम करण्या साठी पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन आलो आहे आणि उपेक्षिताना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपला समाज पेटून उठणार नाही का? जिवा महालाचा इतिहास आपण डोळ्या समोर ठेवा.
मायक्रो ओबीसी वर अन्याय झाला तर 24 तास हा संजय केनेकर आपल्या साठी ए टी एम मशीन बनायला तयार आहे मला वापरा.
गोकुळ आष्ट्मीला इम्तियाज जलील यांनी मांस रस्त्यावर आणले मी त्यांना समजावलं आणि त्यानंतर 10 हजार लोक बाहेर काढून कावड यात्रा काढली.
मला मुंडे, फडणवीस यांनी ताकत दिली. माझा मायक्रो ओबीसी समाज सुजलाम सुफलाम करण्याचा मला प्रयत्न करायच आहे. आपण ही आपला माणूस दिसला की त्याला ताकत दया. आपण धर्म संस्कृतीचे रक्षक आहोत हे लक्षात असू दया.
प्रत्येक मायक्रो समाजाची 10 मुले मुली आमच्या कडे दया आम्ही त्यांचं कल्याण करून दाखवू. समाजाचे अनेक प्रश्न आहेत. या विषयी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचे काम मी करेल असे अभिवचन ही त्यांनी या वेळी बोलताना दिले.

या वेळी बोलतानाराजकिशोर पापा मोदी म्हणाले की, मायक्रो ओबीसी समाज मेहनती ने जगणारा समाज आहे. आ. केणेकर साहेबाच्या माध्यमातून रोहिणी आयोगाची अमलाबजावणी होणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना पदरात पाडून घ्याव्या लागणार आहेत. रोहिणी आयोग लागू करण्या साठी प्रयत्न व्हावे.
मायक्रो ओबीसी समाजाने घराबाहेर पडले पाहिजे. आपले संघटन व्हायला हवे. भगवान दळे यांनी पुढाकार घ्यावा आम्ही सर्वतोपरी त्यांच्या सोबत आहोत.

या वेळी बोलताना भगवान दळे म्हणाले की, सर्व मायक्रो ओबीसी च्या समस्या सारख्या आहेत. ओबीसी म्हणून एकत्र आलो तरी आपल्यावर अन्यायच आहे. ओबीसी नेता म्हणून आम्ही नेता मोठा केला मात्र बीड जिल्ह्यात आमच्यावर अन्यायच केला गेला आहे.
ओबीसी मधील बहुसंख्य लोकसंख्या असलेला समाज भाऊ म्हणून आम्हाला कधीही सोबत घेत नाही. रोहिणी आयोग लागू झाला तर आपल्याला न्याय मिळणार आहे. 18 संतांचे वारस आपल्या सोबत आहेत. आजची ही सुरवात आसुन निश्चित या लढ्याला यश मिळेल.
यावेळी बोलताना सचिन साठे म्हणाले की, आपला देश हा बहुजन समाजातील छोट्या जातीने निर्माण झालेला देश आहे. सर्व जातींचे लोक पुढे आले पाहिजेत. आपण एकजूट झालो तरच आपल्या समस्या सुटतील.
या वेळी बोलताना शशिकांत आमणे म्हणाले की, आई जेऊ देईना बाप भीक मागू देईना अशी अवस्था छोट्या जातीची झाली आहे. ओबीसी वर अन्याय होताना आपण गप्प आहोत.
या वेळी बोलताना संध्या राजपूत म्हणाल्या की मायक्रो ओबीसी एक व्हावा या उद्देशाने मी कार्यक्रमास आले आसुन केणेकर साहेबांच्या नेतृत्वा खाली निश्चित हे संघटन होईल.
या वेळी बोलताना विजय देवडे म्हणाले की आज मायक्रो ओबीसी जागा होत असून गोसावी समाजाची अवस्था अत्यंत बिकट आसल्याचे मत कैलास गोसावी यांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी बोलताना अरुण भालेकरं म्हणाले की आज पर्यंत नेतृत्व नसल्याने ताकतीने मायक्रो ओबीसी रस्त्यावर उतरला नाही. आपल्यातले गट्स आपण ओळखू शकलो नाहीत. नेत्यांच्या मागे पळणारा हा समाज नाही. नेत्याच्या मागे पळण्या पेक्षा कार्यकर्त्यांने स्वतःची कामे केली तर तो नेता बनेल.
या वेळी प्रवीणजी जानोरकर, कैलास गोसावी यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पंडित तर सूत्रसंचालन तुकाराम सुवर्णकार यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश वेदपाठक, संजय तेलंग, सय्यद अमजत भाई, शेख नासिर भाई, महेश वेदपाठक, बबन जंगले, रमाकांत सुवर्णकार, मुनवर भाई बागवान, ज्ञानेश्वर पोतदार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
Post Views: 358