दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ,साखर कामगारांना अंधारात ठेवून 132 कोटी रुपयांत कवडीमोल भावात विकला ..!!
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ,साखर कामगारांना अंधारात ठेवून 132 कोटी रुपयांत कवडीमोल भावात विकला ..!!
अंबाजोगाई /प्रतिनिधी
सभासद ,ऊस उत्पादक शेतकरी ,साखर कामगार यांना अंधारात ठेवून 104 हेक्टर 94 आर जमीन बेकायदेशीर विक्री केली. विक्री केलेल्या क्षेत्रापैकी
कुळ कायदा कलम63(अ) 5 च्या तरतुदी स अधीन खरेदी विक्रीस ,प्रतिबंध व सिलिंग कायद्याने वाटप झालेली 56हेक्टर 86आर जमिन देखील बेकायदेशीर विक्री केली.
चेअरमन पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे व इतर संचालक मंडळाची लेखी संमती .
सद्या 1000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रत्येकी 10हजार रु. अनामत ठेवी
एकुण 1 कोटी रुपये व्याजासह परत द्यावेत.
व 7500 संस्थापक सभासद ऊस उत्पादकांचे भाग भांडवल प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे शेअर्स रक्कम
7 कोटी 50 लाख रु व्याजासह परत द्यावेत.
कारखान्यात काम करणारे साखर कामगार यांचे थकीत पगार ,सेवानिवृत्त वेतन, इतर लाभांश भत्ते
करोडो रुपये तात्काळ विलंब व्याजासह द्यावेत.
मागील 10 वर्षात ऊस गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊस बिले दिले नाहीत
थकीत असलेली एफआरपी रक्कम (ऊस दर नियंत्रण कायदा 1966 च्या तरतुदीनुसार 15% विलंब व्याजासह देण्यात यावी )
यावर्षी वैद्यनाथ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळप कोठे करायचे हा मोठा प्रश्न ?
13 बँकांचे करोडो रुपयांचे कर्ज
शासनाचे भाग भांडवल कर्ज 16 कोटी 80 लाख 19 हजार रुपये बोजा
युनियन बँक ऑफ इंडिया ,उस्मानगर ,औरंगाबाद ,भाग्यलक्ष्मी महिला नागरी को-ऑपरेटिव बँक नांदेड, खामगाव अर्बन बँक ,खामगाव ,बुलडाणा ,जनसेवा सहकारी बँक बोरिवली,नगर अर्बन कॉ. ऑपरेटिव्ह बँक शाखा अहमदनगर ,नागपूर सहकारी बँक लि. नागपूर जनता सहकारी बँक लि. पुणे ,पुणे
कॅन्टोमेंट सहकारी बँक लि.पुणे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, अलिबाग ,डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा ,औरंगाबाद ,जिजामाता महिला सहकारी बँक लि.पुणे वैद्यनाथ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक शाखा पांगरी , ,द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक शाखा परळी ,
विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था बीड
यांचे शासकीय भाग भांडवल रु.667.00लाख कर्ज बोजा
व शासकीय कर्ज रु.1013.19 लाख कर्ज बोजा
फेरफार (1876)
लीज पेंडंसी फेरफार नंबर( 2027 ) 40 आर जमीन लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ला 99 वर्षाच्या करारावर 10 हजार रु भाडेपट्ट्या ने दिली आहे.
राज्य कर आयुक्त वस्तू सेवा कर कार्यालय, बीड
यांचा रक्कम रु.27,61,06,397/- बोजा आहे
फेरफार (2038)
राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर कार्यालय,बीड यांचा 38,91,78,616/- बोजा आहे
फेरफार नंबर (2075)
एवढ्या वित्तीय संस्थेचे कर्ज बोजा असताना सरफेसी ऍक्ट नुसार युनियन बँक ऑफ इंडिया सोडता इतर बँकांना जिल्हाधिकारी बीड यांनी नोटीस दिली का? नाही
सातबारा कर्ज बोजा नोंद असताना दुय्यम निंबधक अंबाजोगाई यांनी खरेदीखत नोंदणीकृत कसे केले ?
कारखाना शेड :-4500 TDC
जुनी डिस्टलरी :30 KLPD
नवी डिस्टलरी:30KLPD
इथेनॉल प्लॅन्ट :45KLPD
बग्यास प्लॅन्ट
को जनरेशन : 9MW+12MW
वाहने आणि इतर साहित्य सामुग्री यांचे मूल्य ?
विक्री केलेली कारखान्याची जमीन
गाव पांगरी ता.परळी गट नंबर 392 मधील 3 हेक्टर 63 आर
गट नंबर 65 मधील 25 आर
गट नंबर 67 मधील 18 आर
गट नंबर 68 मधील 61 आर
गट नंबर 70 मधील 1 हेक्टर 30 आर
गट नंबर 75 मधील 1 हेक्टर 30 आर
गट नंबर 78 मधील 13 आर
गट नंबर 80 मधिल 79 आर
गट नंबर 82 मधिल 64 आर
गट नंबर 83 मधील 6 आर
गट नंबर 84 मधिल 59 आर
गट नंबर 86 मधिल 61 आर
गट नंबर87 मधिल 1हेक्टर 40 आर
गट नंबर 88 मधील 24 आर
गट नंबर89 मधील 30 आर
गट नंबर 90 मधील 97 आर
गट नंबर 92 मधील 59 आर
गाव कौठळीतांडा ता.परळी येथील
गट नंबर 251 मधील 13 हेक्टर 11 आर
गट नंबर 381 मधील 14 हेक्टर 65 आर
गट नंबर 382 मधील 15 हेक्टर 44 आर
गट नंबर 383 मधील 14 हेक्टर 94 आर
गट नंबर 384 मधिल 8 हेक्टर 15 आर
गट नंबर 385 मधील 5 हेक्टर 38 आर
गट नंबर 386 मधिल 2 हेक्टर 31 आर
गट नंबर 388मधील 6 हेक्टर 38 आर
गट नंबर 389 मधिल 10 हेक्टर 99 आर
एकुण क्षेत्र 104 हेक्टर 94 आर विक्री झाले आहे.
विक्री क्षेत्रापैकी
कौठळी तांडा परळी येथील गट नंबर 251 मधिल फेरफार क्र .4135 नुसार 12 हेक्टर 80 आर क्षेत्र कुळ कायदा कलम 63 -अ -5 च्या तरतुदीस अधिन खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे.
गट नंबर 381 मधील फेरफार क्र.3088 नुसार
14 हेक्टर 65 आर क्षेत्र खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे.
गट नंबर 382 मधिल फेरफार क्र( 1 )नुसार 15 हेक्टर 44 आर क्षेत्र खरेदी विक्रीस प्रतिबंधित आहे.
गट नंबर 385 मधिल 5 हेक्टर 28 आर क्षेत्र फेरफार क्र 3088 नुसार खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे.
गट नंबर 386 मधिल 2 हेक्टर 31 आर क्षेत्र फेरफार क्र.3088 नुसार खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे.
गट नंबर 388 मधील 6हेक्टर 38 आर क्षेत्र फेरफार क्र.4210 नुसार खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे.
सहदुय्यम निंबधक अंबाजोगाई यांनी ऑफलाइन खरेदी खत नोंदवले विक्री क्षेत्रामधील सातबारावर कर्जाचे बोजे असताना खरेदी विक्री करणे कायदेशीर नाही असे करावयाचा असल्यास ज्या वित्तीय संस्थेचे सातबारावर कर्ज बोजा आहे त्या संस्थेचे ना हरकत अथवा निरंक किंवा बेबाकी असणे आवश्यक असते.
खरेदीखत दस्त नंबर 49 66/2024 ऑफलाइन नोंदवल्यानंतर मंडळ अधिकारी नागापूर व पिंपळगाव गाडे व तलाठी सज्जा कौठळी (तांडा)व पांगरी ता.परळी यांनी सदर खरेदीखतानुसार नवीन फेरफार नोंदवण्यास आक्षेप आलेला असताना देखील आक्षेपाचा विचार न करता खरेदी खताआधारे नवीन खरेदीदाराची नोंद घेतली आहे. यावर उपजिल्हाधिकारी परळी यांच्याकडे ऍड. परमेश्वर गित्ते ,परळी यांनी लेखी तक्रार दिली असुन.15 दिवसात अहवाल सादर करण्याचे मंडळ अधिकारी ,गाडे पिंपळ गाव ,नागापूर ,तलाठीसज्जा कोठळी तांडा ,पांगरी यांना आदेश दिले आहेत.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या वारसांनी चेअरमन तथा विद्यमान पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व इतर संचालक मंडळाच्या संगणमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ,साखर कामगारांना ,इतर वित्तीय कर्ज घेतलेल्या बँकांना अंधारात ठेवून कारखान्याचा व जमिनीचा बेकायदेशीर विक्री व्यवहार केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर आयुक्त,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त चौकशी समिती नेमुन तात्काळ खरेदीखत रद्द करण्याचे आदेश द्यावेत तसेच दोषींवर गुन्हे दाखल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी ऊस गाळप करण्याचा प्रश्न सोडवावा .अन्यथा येणाऱ्या दिवाळीत ऊस उत्पादक ,साखर कामगार यांच्या सह लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर गोपीनाथगड,पांगरी ता.परळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल.
—श्री. कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना, बीड जिल्हा
