Skip to content
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले वसुंधरा महाविद्यालय

घाटनांदुर (प्रतिनिधी)
येथील वसुंधरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने पूरग्रस्तांना मदत फेरी काढून आर्थिक मदत केली आहे.
कामधेनु सेवाभावी संस्थेचे सचिव व अधिसभा सदस्य गोविंदराव देशमुख यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 20,000/- रुपये मदत केली. तसेच वसुंधरा महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने 19,600/- रुपयांची मदत करण्यात आली. वसुंधरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घाटनांदुर मध्ये मदत फेरी काढून व्यापारी, दुकानदार व प्रतिष्ठित नागरिकांनी 11,400/- रुपये मदत केली . अशी एकूण 51000/- रुपये मदत केली आहे.
ही मदत जमा झाली असून लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे .या मदत फेरीमध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ .मकरंद जोगदंड,प्रा.डॉ.गोविंद झाडके, कार्यालयीन अधीक्षक उमेश सरनाईक सह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Post Views: 119
error: Content is protected !!