Skip to content
महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (एम-सेट) परीक्षेत प्रिंयका वशिष्ट कागणे (नेहरकर) यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जून 2025 मध्ये सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (एम एच-सेट) परीक्षेत प्रिंयका वशिष्ट कागणे (नेहरकर)या केमिकल सायन्स या विषयात मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रामधून पात्र ठरल्या आहेत.
प्रियंका कागणे यांनी या पूर्वी पदव्युत्तर पदवी परीक्षा पूर्ण केली होती. जून 2025 मध्ये एसपीपीयू नोडल एजन्सी यूजीसी मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र आणि गोवा सरकारने नामांकित केलेल्या सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांसाठी महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (एम एच-सेट) परीक्षा घेण्यात आली होती. या मध्ये प्रिंयका व वशिष्ट कागणे (नेहरकर) या केमिकल सायन्स या विषयात मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रामधून पात्र ठरल्या आहेत. 30 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचा सहाय्यक प्राध्यापकांच्या पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात प्रियंका कागणे या चांगल्या मार्कांने पात्र ठरल्या आहेत.
प्रियंका कागणे या मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस सब इन्स्पेक्टर वशिष्ट कागणे यांच्या कन्या असून प्रियंका यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 427
error: Content is protected !!