*समाधान व्यसनमुक्ती केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा* *~ सुप्रसिद्ध मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*
*समाधान व्यसनमुक्ती केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा*
*~ सुप्रसिद्ध मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांच्या समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्राच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त सुसज्ज सोयींनी युक्त अत्याधुनिक व्यसनमुक्ती केंद्राचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार, दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई येथे संपन्न होणार आहे. येणाऱ्या काळात व्यसनाधीनता हा अत्यंत वेगाने वाढणारा मानसिक आजार असल्याचे सुतोवाच डॉ.राजेश इंगोले यांनी केले आहे.
या व्यसनाधीनतेच्या विळख्यात हजारो तरूण तरूणी व समाजातील प्रत्येक घटक सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. समाजामध्ये अत्यंत वेगाने वाढत असलेली व्यसनाधीनता थांबविण्यासाठी पात्र मानसोपाचाहर तज्ज्ञ असलेले व्यसनमुक्ती केंद्र तुरळक आहेत. त्यामुळे लोकांची ही गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासत हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करीत असल्याचे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. व्यसनाधीनता ही तज्ज्ञ माणूस उपचार तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व त्याच्या तज्ञ उपचाराखाली उपचार केल्यास वेगवेगळ्या प्रकारची व्यसने सुटू शकतात आणि तो व्यक्ती या व्यसनांच्या विळख्यातून सही सलामत बाहेर पडू शकतो. त्यामुळे हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करीत असल्याचे डॉ राजेश इंगोले यांनी सांगितले. हे व्यसनमुक्ती केंद्र अत्याधुनिक सोयींनी युक्त, तज्ज्ञ समुपदेशक, तज्ज्ञ कर्मचारी वृंद, मानसोपचार तज्ज्ञ यांच्या देखरेखीखाली कार्यरत राहणार असल्याचे डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले.
=======================
=======================
