आई-वडिलांनी मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दिली तपासात आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याचे झाले उघडकिस
आई-वडिलांनी मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दिली तपासात आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याचे झाले उघडकिस
अंबाजोगाई :
आपली मुलगी पळून गेल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलिसात केली खरी. मात्र पोलीस तपासात तीन वर्षांपूर्वी करून दिलेला अल्पवयीन मुलीचा विवाह उघडकीस आल्याने आता आई-वडिलांसह सहा जणाविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दिनांक 9 जून 2025 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथून आपली मुलगी अज्ञात आरोपीने पळवून नेल्याची तक्रार सावित्रा बिडगर या मुलीच्या आईने अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तक्रारीत ज्या मुलावर पळवून नेली असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या मुलाचा शोध घेतला असता या प्रकरणाशी त्या मुलाचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर व सदर मुलगी ही तपासात पुणे येथे मिळून आल्यानंतर तिच्याकडून अधिक चौकशी केल्यानंतर या मुलीचा अल्पवयीन असताना तिच्या आई-वडिलांनी दिनांक २८ मार्च २०२२ रोजी आमोल मोतीराम मदने (रा. फरदपूर, ता. रेणापूर, जि. लातूर) याच्यासोबत विवाह लावून दिलेला होता.
सदर मुलीचा विवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्या नंतर याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी बंडु जांभळे यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बंडू जांभळे हे ग्रामपंचायत जोगाईवाडी येथे नेमणुकीस असून चतुरवाडीचे कामकाजही तेच पाहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, चतुरवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन हिचा विवाह दिनांक २८ मार्च २०२२ रोजी आमोल मोतीराम मदने (रा. फरदपूर, ता. रेणापूर, जि. लातूर) याच्यासोबत लावण्यात आला. विवाहावेळी मुलगी अल्पवयीन असून बालविवाह झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तक्रारीनंतर ग्रामपंचायत कर्मचारी अन्सर हमीद पठाण, आशा कार्यकर्ती छाया खांडेकर, अंगणवाडी मदतनीस सुमन पवार व लिपिक अविनाश वाकडे यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीतूनही हा विवाह झाल्याची खात्री पटली.
यावेळी पिडीत मुलीचे आई-वडील, मुलाचे वडील मोतीराम मदने, आई संजीवनी मदने हे सर्व विवाहास उपस्थित होते. हा विवाह संजय बाबुराव गोडबोले (रा. जोगाईवाडी) यांच्या हस्ते लावण्यात आला होता. अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असतानाही विवाह लावून देण्यात आल्याने मुलीचे वडील संतोष बीडगर, आई सावित्रा संतोष बिडगर रा चतुरवाडी मुलीचा पती अमोल मदने, मुलाचे वडील मोतीराम मदने व संजीवनी मदने सर्व राहणार भरतपूर ता रेनापुर तसेच विवाह लावणारे ब्राह्मण संजय गोडबोले रा. जोगाईवाडी अशा सहा जणांविरुद्ध ग्रामविकास अधिकारी बंडू जांभळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गु र न 288/2025 कलम 9,10,11 बालविवाह प्रतिबंधक 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश भागवत हे करत असून पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान, पोलीसांनी बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
