Tuesday, September 9, 2025
ताज्या घडामोडी

ज्या हॉटेल दरबार मध्ये अविनाश देवकरची हत्या झाली त्या हॉटेल चालका विरुद्ध पोलिसात वेगळा गुन्हा दाखल

ज्या हॉटेल दरबार मध्ये अविनाश देवकरची हत्या झाली त्या हॉटेल चालका विरुद्ध पोलिसात वेगळा गुन्हा दाखल

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    ज्या हॉटेल दरबार मध्ये अविनाश देवकर याची हत्या झाली त्या हॉटेल मध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी नसतांना  बेकायदेशीर रित्या ग्राहकास मद्य सेवन करण्याकरीता लागणारे साहित्य व सुविधा देऊन दारुपिण्या करीता ग्राहकाची सोय केल्याच्या कारणाहून हॉटेल चालका विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याविषयी प्राप्त माहिती अशी की काल दि. 26/08/2025 रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई ते साखर कारखाना रोडवर असलेल्या हॉटेल न्यु दरबार येथे अविनाश देवकर सह अन्य काही जण मद्यप्राशन करत बसलेले असताना देवकर या युवकाच्या डोक्यावर स्वराज पौळ या युवकांने तीक्ष्ण हत्याराने वार केल्या मूळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आंबजोगाई शहर पोलिसांनी गंभीर दखल 
घेऊन हॉटेल न्यू दरबारचे चालक 
संतोष कारभारी शिनगारे रा. आंबेडकर कॉलनी बीड रोड मोरेवाडी अंबाजोगाई व चंद्रकांत अर्जुनराव साबळे रा. तुळजा भवानीनगर नागझरी परीसर अंबाजोगाई यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी नसतांना विनापरवाना बेकायदेशीर रित्या ग्राहकास मद्य सेवन करण्याकरीता लागणारे साहित्य व सुविधा देऊन दारुपिण्या करीता ग्राहकाची सोय केल्याच्या कारणाहून पो हे कॉ पिराजी व्यंकट गुट्टे यांच्या फिर्यादीवरून संतोष कारभारी शिनगारे व चंद्रकांत अर्जुनराव साबळे यांच्या विरुद्ध गु.र.नं. 432/2025 कलम 68 (अ) (ब) महाराष्ट्र दारूबंदी कायदा या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पो.नि शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली पो हे कॉ अंमलदार 1485 वडकर हे तपास करत असून या घटनेने ज्या ज्या हॉटेल व धाब्यावर विनापरवाना दारू दारूची विक्री होते व ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येते अशा हॉटेल व धाबे मालकाचे धाबे  दनानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!