अंबाजोगाई तालुक्यातील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या साठी अधिकाऱ्यात लागली स्पर्धा
अंबाजोगाई तालुक्यातील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या साठी अधिकाऱ्यात लागली स्पर्धा
अवैद्यरीत्या दारू विक्रीस घेऊन जाणाऱ्यावर आंबजोगाई शहर पोलिसांची कारवाई
अंबाजोगाई प्रतिनिधी :–
बीड पोलीस अधीक्षकाचा कार्यकाल सांभाळल्या पासून माननीय नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील अवैद्यरीत्या धंदे करणाऱ्यावर पोलिस यंत्रनेची करडी असून या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या साठी बीड स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे व अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्यात स्पर्धा लागलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दिनांक १८/०८/२०२५ रोजी अंबाजोगाई शहरात अवैद्यरित्या विना परवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारुची क्रेटा मधुन वाहतुक करीत आहेत अशी गोपनिय बातमी मिळाल्यावरुन मा. नवनित काँवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्री. ऋषीकेश शिंदे, पोलीस उप अधिक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड सहा. पोलीस अधिक्षक श्री शिंदे साहेब पोह/१६७१ गायकवाड, पोह/१६९८ गुट्टे, पोह/१५७५ आचार्य, पोह/१४८५ वडकर, पोअं/१९५४ गायकवाड, पोअं/१९५४ गित्ते यांनी करून कार्यवाही करून बालासाहेब माणिक केंद्रे रा. धावडी ता. अंबाजोगाई जि. बीड यांचेकडून क्रेटा गाडी क्रमांक MH १२ BZ २२११ ही विदेशी दरुच्या बाटल्यासह एकुण १४,३७,८४० रुपयाचा माल जप्त करून शहर पोस्टेला गुन्हा क्रमांक ४१६/२०२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांची जुगार अड्ड्यावर धाड

दिनांक 19/08/2025 रोजी मा नवनित काँवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ऋषीकेश शिंदे, पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, पोउपनी संजय फड, महादेव आवले, मुकेश खरटमोल, अशोक खेलबुडे नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग अंबाजोगाई व पोलीस कर्मचारी हनुमंत चादर, भागवत नागरगोजे नेमणुक अंबाजोगाई शहर यांनी गोपनिय माहीती वरुन अंबाजोगाई शहरामध्ये जुगार अड्यावर धाड टाकून राहुल गायकवाड, असलम मोईम शेख, महेश शिवराम घुले, सोमनाथ सुदाम पवार व बुक्की मालक चाँद गवळी, गणेश नागरगोजे, अन्वर सय्यद सर्व राहणार अंबाजोगाई या सर्वाना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन जुगार साहीत्य व नगदी पैसे 60790/- रुपायाचा माल मिळुन आल्याने सर्व आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
