Tuesday, September 9, 2025
ताज्या घडामोडी

शेपवाडी परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर आंबाजोगाई शहर पोलिसांची  धाड, चार आरोपीस रंगेहात पकडले, चार लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त

शेपवाडी परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर आंबाजोगाई शहर पोलिसांची  धाड, चार आरोपीस रंगेहात पकडले, चार लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त

 अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    आंबाजोगाई शहर पोलिसांनी शेपवाडी परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपीस रंगेहात पकडून त्यांचे कडून जुगार साहित्यासह चार लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

    या विषयी प्राप्त माहिती अशी की दिनांक 17/08/2025 रोजी गोपनीय माहीती मिळाली कि शेपवाडी परिसर येथे योगेश शेप यांचे पत्राचे शेडमध्ये काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहे अशा गोपनिय माहीती मिळाल्या वरुन मा. नवनित काँवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री शरद जोगदंड, सपोनि कांबळे, पोउपनि अनंद शिंदे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, भागवत नागरगोजे, सुशांत गायकवाड यांनी सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता त्याठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये 4 ईसम नामे अंजिंक्य कदम, धनराज चाटे, योगीराज शेप, लक्ष्मण शेप सर्व राहणार अंबाजोगाई हे बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळतांना व खेळवित असताना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन तिर्रट जुगाराचे साहित्य व नगदी 9300/- रुपायाची रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटार सायकल किमंत अंदाजे 3,98,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल असा एकुन 4,07,300/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 415/2025 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार अमोल गायकवाड हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!