Skip to content
*मुख्य न्यायदंडाधिकारी (न्यायाधीश) प्रशांतजी कुलकर्णी साहेबांनी साधला जिजाऊ शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद*

अंबाजोगाई(प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहराचे भूमिपुत्र व सध्या चंद्रपूर वरिष्ठ न्यायालय येथे प्रमुख न्याय दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री प्रशांतजी कुलकर्णी साहेब यांनी जिजाऊ शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा आहार तसेच चांगल्या सवयी,संस्कार याचे धडे विद्यार्थ्यांना दिले
तसेच आंबेजोगाई शहर हे सांस्कृतिक शहर असल्याचे सांगत स्वामी रामानंद तीर्थ व स्वामी मुकुंदराज यांच्या साहित्याचा ठेवा या शहराला प्राप्त आहे. मोठा अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे सांगत विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवले.
यावेळी उपस्थित शिक्षकांना विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिजाऊ शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत आहे हे कौतुकाची बाब असल्याचेही कुलकर्णी साहेब म्हणाले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष पवार व शांतिदूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अंकुशराव लोंढाळ यांची उपस्थिती होती.
Post Views: 257
error: Content is protected !!