एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीतुन घेतले ताब्यात
एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीतुन घेतले ताब्यात
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी शहरातून एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही झालेल्या एका आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही साठी परळी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उप निरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शना खाली पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने व पो शी सचिन आंधळे यांच्या टीमला दिनांक 18/08/2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परळी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की शुभम दशरथ जाधव वय 32 वर्षे राहणार नैकोटा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी हा मु विद्यानगर परळी हा `MPDA“` मधील आरोपी इसम चेंबरी रेस्ट हाऊस जवळ उभा आहे या गोपनीय माहितीच्या आधारे या टीम ने सापळा रचुन चेंबरी रेस्ट हाऊस जवळ जाऊन त्या आरोपीस ताब्यात घेऊन परळी शहर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट सह हजर केले.
