बुरुड समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा, कु रूपाली पळसे होणार समाजातील पहिली महिला डॉक्टर
बुरुड समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा, कु रूपाली पळसे होणार समाजातील पहिली महिला डॉक्टर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील बुरुड समाजाचे रहिवाशी श्री. शंकर पळसे यांची कन्या कु. रूपाली शंकरराव पळसे हिचा जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षे मधून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय,अंबाजोगाई येथे प्रवेश निश्चित झाल्या मूळे कु. रूपाली व पळसे परिवारांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
अतिशय कष्टातून व बिकट परिस्थितीतून शंकर पळसे यांनी आपल्या पाल्यांना शिक्षण दिले. पालकाच्या कष्टाची जाण घेऊन रूपालीने उत्तम शिक्षण घेतले तिच्या व पालकाच्या परिश्रमाचे फलित म्हणजे कु. रूपाली हिची मेडिकल कॉलेज, अंबाजोगाई येथे एमबीबीएस साठी निवड झाली. आई वडिला प्रमाणेच मुलीने हि घरची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तेवढ्याच जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले फलित म्हणजे तिची एम बी बी एस साठी झालेली निवड होय. तिच्या शैक्षणिक यशामुळे अंबाजोगाईतील बुरुड समाजाच्या इतिहासात तिची पहिली महिला डॉक्टर म्हणून नोंद होनार आहे. याचा सर्व समाजाला अभिमान आहे.
रूपालीच्या यशामुळे समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रूपालीच्या यशामुळे समाजातील शालेय युवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासमोर चांगला आदर्श निर्माण झाला आहे. शंकर पळसे आणि कन्या कु. रूपाली, विठ्ठल पळसे आणि समस्त पळसे परिवाराचे बुरुड समाजा सह अंबाजोगाई शहर वासिया मधून अभिनंदन होतं आहे.
Post Views: 331