Skip to content
कर्करोग जनजागृती साठी महिलांचा पुढाकार महत्वाचा – आ. नमिता मुंदडा
——-
वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व रोटरी क्लब यांच्या वतीने मोफत कर्करोग निदान शिबिर
—–
अंबाजोगाई -: दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांची वाढ होत आहे.ही रोखण्यासाठी
कर्करोग जनजागृतीसाठी महिलांचा पुढाकार महत्वाचा आहे.असे प्रतिपादन आ.नमिता मुंदडा यांनी केले.
शनिवारी सकाळी आद्यकवी मुकुंदराज सभागृहाच्या प्रांगणात
स्व.डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, विवेकानंद कॅन्सर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या वतीने मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आ.नमिता मुंदडा बोलत होत्या.
यावेळी मंचावर भाजपाचे नेते अक्षय मुंदडा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव मंजुषा जोशी, इनरर्व्हील क्लबच्या अध्यक्षा संगीता नावंदर, माजी अध्यक्ष
कल्याण काळे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, विवेकानंद कॅन्सर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. बाजीराव जाधव, डॉ.मिथाली बिराजदार, कपिल वाघमारे,दिपाली कस्तुरे, राजेश्वरी सुराणा,दुर्गा रसाळ,सुखदेव थोरात,यांची उपस्थिती होती. या शिबिरात ८४ जणांची मोफत कर्करोग तपासणी झाली. यावेळी कर्करोग जनजागृती साठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चना स्वामी यांचा सत्कार आ. मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबचे डॉ.सुरेश अरसुडे, प्रा. संतोष मोहिते,डॉ. निशिकांत पाचेगावकर, प्रवीण चोकडा, स्वप्नील परदेशी, अजित देशमुख,अभिजित मुंदडा,रुपेश रामावत, वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे
संजय गंभीरे,डॉ.सुधीर धर्मपात्रे,प्रशांत अदनाक,शिरीष मुकडे,शरद इंगळे,अनंत अरसूडे,शशिकांत गायकवाड,मंदार काटे,गौरव लामतुरे,संतोष जिरे,शैलेश स्वामी,महेश अंबाड,राहुल कापसे,मयुर रणखांब,दीपक कोरडे,योगेश कडबाने,अजय राठोड,सचिन केंद्रे,सचिन वाघमारे,अक्षय भुमकर,प्रताप देवकर उपस्थित होते.
—–
दर महिन्याला होणार शिबिर:
वसुंधरा
सेवा प्रतिष्ठाण, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व विवेकानंद कॅन्सर ॲन्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय, अशा ठिकाणी मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. असे सांगून अंबाजोगाईत कॅन्सर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
-: आ. नमिता अक्षय मुंदडा,
केज विधानसभा मतदार संघ.
—–
Post Views: 193
error: Content is protected !!