Skip to content
ताई महोत्सवा अंतर्गत मोफत कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
स्व. डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ताई महोत्सवात मोफत कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राज्याच्या तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री स्व.डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटर लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दिनांक १६ ऑगस्ट २०२५ अशी सलग पाच दिवस सकाळी ९ ते दुपारी २ वा. पर्यंत नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीराचा लाभ घेणा-या रुग्णांनी शिबीरामध्ये येताना आधारकार्ड / राशनकार्ड झेरॉक्स चालु असलेले औषध गोळ्या व तज्ञ डॉक्टरांचे रिपोर्टस् सोबत आणावे.
शिबीराचे सहभाग घेण्यासाठी
कल्याण काळे भाजपा, शहर उपाध्यक्ष मो. क्र. 9325434999 रो.प्रा. रोहिणी पाठक अध्यक्ष मोबा. 9325434999, महाद् मस्के वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण, मोबा. 9423923333, सचिव, रोटरी मोबा. 9403414658 रो. मंजुषा जोशी,
अनंत अरसुड, वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण मोबा. 7276189999 रो. धनराज सोलंकीरो प्रोजेक्ट डायरेक्टर मोबा. 9422242326, महादेवराव सुर्यवंशी अध्यक्ष, व्यापारी महासंघ, केज मोबा. 9767802001, डॉ. निशीकांत पाचेगावकर प्रोजेक्ट डायरेक्टर मोबा. 9422489844 या क्रमांकावर
केज मतदारसंघातील सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Post Views: 134
error: Content is protected !!