Skip to content
शेपवाडी परिसरातील उमेश बार येथील जुगार अड्ड्यावर अंबाजोगाई पोलिसांची धाड 11 जन ताब्यात 13 लाख 74 हजार रुपयांचा
अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या शेपवाडी परिसरातील उमेश बार या ठिकाणी सर्व असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 11 आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे कडून 13 लाख 74 हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 25/07/2025 रोजी गोपनीय माहीती मिळाली कि शेपवाडी परिसर येथे उमेश बार मध्ये बंद खोलीमध्ये काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहेत. या गोपनिय माहीती वरुन मा. नवनित कौवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधीकारी अंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली श्री शरद जॉगदंड, पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, पोउपनि अनंद शिंदे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, श्रीकृष्ण बडकर, दत्तात्रय इंगळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, रविकुमार केन्द्रे, प्रविणकुमार गित्ते, भागवत नागरगोजे या पथकाने
माहितीचे ठिकाणी जावून छापा मारला असता त्याठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये ईसम बसुन तिरंट नावाचा जुगार खेळ खेळतांना व खेळवित असताना मिळून आले त्यांचे ताब्यातून तिरंट जुगाराचे साहित्य व नगदी 106.400/- रुपायाची रोख रक्कम, मोबाईल फोन किमंत अंदाजे 5,68,000/-रुपये किमतीचे, व स्कापीओ कार किमंत 7,00,000/- रुपये असा एकून 13, 74, 400/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन रविशंकर व्यंकटराव मुंडे वय 32 वर्षे रा वरवटी ता. परळी वैजेनाथ, धनराज श्रीराम फड वय 32 वर्षे रा कन्हेरवाडी, ता परळी जि. बीड, कुलदीप ज्ञानोबा शेप वय 21 वर्षे रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई, नितीन शिवदास शेप वय 30 वर्षे रा शेपवाडी, अंबाजोगाई, विराज भगवान काटकर वय 25 वर्षे, रा. चौसाळकर कॉलनी, अंबाजोगाई, आप्पाराव वैजेनाथ लाड वय 36 वर्षे, रा. भाग्यनगर, अंबाजोगाई, किशोर सहदेव उंदरे वय 28 वर्षे रा. अमृतनगर अंबाजोगाई, धनराज बळीराम चाटे वय 26 वर्षे रा. तथागत चौक, अंबाजोगाई, अमोल राजाभाऊ पाचंगे वय 36 वर्षे रा. टोकवाडी, ता. परळी, जि.बीड, सतीश संपत शेप वय 27 वर्षे रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई, प्रदिप अनिल शेप वय 28 वर्षे रा. शेपवाडी, अंबाजोगाई यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करत आहेत.
Post Views: 410
error: Content is protected !!