Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

गुणवत्तेच्या जोरावर वरद बर्दापूरकर याने मिळविले सव्वा कोटीचे पॅकेज, स्पर्धात्मक परीक्षेतून स्वत:ला घडवले

गुणवत्तेच्या जोरावर वरद बर्दापूरकर याने मिळविले सव्वा कोटीचे पॅकेज, स्पर्धात्मक परीक्षेतून स्वत:ला घडवले

 

अंबाजोगाई :

     गुणवत्ता असेल तर कुठल्याही कॅम्पसची आवश्यकता पडत नाही. हेच वरद सत्येंद्र बर्दापूरकर याने सिध्द केले आहे. युएसएच्या एका कंपनीने वरदला त्याच्यातील गुणवत्ता पाहुन सव्वा कोटी रुपयाचे पॅकेज दिले आहे. आणि तेही युसए येथे न जाता, घरबसल्या त्याने तो यात कंपनीत कार्यरत झाला आहे.
शालेय जीवनातच शरदला विविध स्पर्धात्मक परीक्षा देण्याची सवय होती. एन.एम.आय.टी जयपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाही त्याने हार्डवर्क करीत विविध देशात जाऊन व ऑनलाईन पध्दतीने हॅकॅथाॅनच्या परीक्षा दिल्या, यातूनच त्याची गुणवत्ता घडत गेली. हॅकॅथाॅन या स्पर्धात्मक परीक्षेतून त्याने २० लाखांचे बक्षिसे जिंकले होते. जवळपास ६ जागतिक हॅकॅथाॅन परीक्षेत त्याने हे यश प्राप्त झाले.

काय आहे हॅकॅथाॅन

अभियांत्रिकी फिल्ड मधील ही परीक्षा असते. प्रोजेक्ट कसे बनवायचे ते यात शिकता येते, याची माहिती ऑनलाईन पध्दतीने घेत, त्याने गुणवत्तेचा आत्मविश्वास कमावला. त्यामुळेच पुढे कुठलाही कॅम्पला जाण्याची आवश्यकता पडली नाही.
—-
गुणवत्ता वाढविण्यासाठी व दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. वरद बर्दापूरकर यालाही योग्य वेळी आवश्यक ते मार्गदर्शन मिळाले. त्याच्या महाविद्यालयातील प्रा. मोहित गुप्ता यांनी त्याला ब्लाॅक चेन ही टेक्नाॅलाॅजीचे मार्गदर्शन केले. साऊथ कोरीयाचे गुजूस ज्यूंग, अमेरिकेचे मॅक्स यांनी ऑनलाईन गाईड केले. विशेष हॅकॅकरोडच्या स्पर्धेमध्ये त्यांची वरदची भेट झाली. अंबाजोगाईत शालेय शिक्षण घेत असताना क्षमता वर्धन अकादमीचे किरण कोदरकर यांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्याने अभियांत्रिकीचा पाया पक्का झाला. आई, वडीलांनी कधी कुठली सक्ती केली नाही. मला माझ्या आवडीचे शिक्षण निवडण्यासाठी त्यांचे पाठबळ मिळाल्याचे वरदने सांगितले.

प्रारंभी वरद याने स्वित्झर्लंडच्या
केशर कॅपिटल्स या कंपनीत ४ महिने कामाचा अनुभव घेतला. त्याच्यातील गुणवत्ता व हॅकॅथाॅनमध्ये मिळवलेले यश
लक्षात घेऊन युएस एच्या व्हर्च्युअल लॅब्स या कंपनीने त्याला एक कोटी २५ लाखाचे पॅकेज देऊन नियुक्त केले. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्याचे काम या कंपनीत होते.
—–
आपण आभ्यास किती वेळ करतो याला महत्व नसते, तर आवश्यक तो आणि लक्षपूर्वक अभ्यास करण्याला महत्व दिले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्यावर आव्हान स्विकारण्यास प्राधान्य दिल्याने यश मिळत गेले. स्पर्धा व शिक्षणाला सामोरे जाताना युवकांनी रिक्स घेऊन, जबाबदारी घेणे शिकले पाहिजे. निवडलेल्या फिल्डमध्ये (हार्डवर्क) मेहनत घेणे खुप आवश्यक असल्याचे वरद बर्दापूरकर याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!